22 वर्षांची मुलगी IAS झाली, IIT आणि IAS ची एकाच वेळी परीक्षा उत्तीर्ण केली

आजच्या पिढीतील बहुतेक तरुणांचे IAS, IPS होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी त्यांना UPSC ची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. नागरी सेवा परीक्षा खूप कठीण असतात. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही ही परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाहीत. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. चांगल्या प्रकारची अभ्यासाची योजना आखावी लागते.

तासनतास अभ्यास करावा लागतो. अभ्यासात स्वतःला झोकून द्यावे लागते. पण ज्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, त्यांना कोणतीही अडचण अडवू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखातून अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी एकाच वेळी दोन परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS ऑफिसर बनल्या आहेत व आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे.

काही विद्यार्थी पदवीच्या अभ्यासासोबतच यूपीएससीची तयारीही करतात. मूळच्या ओडिशाच्या असलेल्या सिमी करण यांनी आयआयटीमधून इंजिनीअरिंग करताना UPSC परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आयएएस अधिकारी बनल्या आहेत. सिमी करण मूळच्या ओडिशाच्या असल्या तरी त्यांचे बालपण छत्तीसगडमध्ये गेले.

तेथूनच त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. सिमी यांचे वडील डीएन करण भिलाई स्टील प्लांटमध्ये काम करतात आणि आई सुजाता भिलाई येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. सिमी यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून 12वीपर्यंत शिक्षण घेतले आणि 12वीमध्ये 98.4 टक्के गुण मिळवून राज्य टॉपर बनल्या. सिमी करण यांनी 12वी नंतर आयआयटीची प्रवेश परीक्षा दिली. यानंतर त्यांची आयआयटी बॉम्बेसाठी निवड झाली आणि त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले.

इंजिनीअरिंग दरम्यान इंटर्नशिप करताना सिमी करण जवळच्या झोपडपट्टी भागात मुलांना शिकवायला गेल्या होत्या, तेव्हा लोकांना मदत करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मग लोकांच्या मदतीसाठी UPSC चा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

सिमी करण यांनी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात स्वत:चा अभ्यास करून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. सिमी सांगतात की, त्यांनी प्रथम टॉपर्सच्या मुलाखती घेतल्या आणि इंटरनेटच्या मदतीने स्वतःसाठी पुस्तकांची यादी तयार केली.

तयारीसाठी त्यांनी UPSC अभ्यासक्रमाचे छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर केले. परीक्षेची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त उजळणी करणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. सिमी करण यांनी स्वयंअध्ययन करून पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

सिमी यांनी सांगितले की मे 2019 मध्ये त्यांनी आयआयटी मुंबईमधून पदवी पूर्ण केली आणि जूनमध्ये यूपीएससीची परीक्षा होती. त्यांच्याकडे तयारीसाठी खूप कमी वेळ होता, परंतु त्यांनी कठोर अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

सिमी करण यांनी 2019 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा देऊन संपूर्ण भारतात 31 वा क्रमांक मिळवला. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या IAS अधिकारी बनल्या तेव्हा त्या केवळ 22 वर्षांच्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page