एका फळविक्रेत्याने तब्बल 11 हजार रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरा लावले, कारण..

आजकाल सुरक्षिततेसाठी अगदी लहान दुकानातही सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. चो’रां’ना ताबडतोब पकडण्यासाठी दुकानदार त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही लावत असतात. एवढेच नव्हे तर आजकाल घरात देखील सीसीटीव्ही लावले जातात. परंतु, तुम्ही कधी एखाद्या फळ विक्रेत्याने सीसीटीव्ही लावला आहे असे ऐकले आहे का? पण हे खरे आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया.

बिहार मधील नवादा येथील हिसुआ बाजारमधील मंगला मार्केटमधून ही घटना समोर आली आहे. येथील एका फळ उत्पादकाने आपल्या फळाच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. एवढेच नव्हे तर त्याने तब्बल 11 हजार रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शुभम असे या फळ विक्रेताचे नाव आहे.

फळाच्या दुकानात सीसीटीव्ही लावल्यामुळे संपूर्ण बाजारात शुभमची चर्चा होती. परंतु, शुभमने आपल्या लॉरीच्या सुरक्षतेसाठी नव्हे तर वेगळ्या कारणासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. आजकाल सीसीटीव्ही कॅमेरे हे खूप महत्वाचे झाले आहेत. परंतु, या फळ वाल्याची खूप चर्चा रंगली.

या फळ उत्पादकाने चो’री टाळण्यासाठी नव्हे तर आपली प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. आता तुम्ही असा विचार करीत असाल की सीसीटीव्ही आणि प्रामाणिकपणा याचा काय संबंध आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, एकदा शुभमच्या लॉरीवर एक ग्राहक आला तो त्याचा मोबाईल विसरला होता. मात्र, तो त्याचा मोबाईल नक्की कुठे विसरला हे त्याला लक्षात नव्हते. त्यानंतर त्याने असा दावा केला की, तो शुभमच्या लॉरीवर आपला मोबाईल विसरला आहे. त्याने तिथे जाऊन चौकशी केली असता शुभम ने मोबाईल नाही असे संगितले.

त्यांनतर शुभमच्या विरोधात त्याने मोबाईल चो’री केल्याचा आ’रो’प करून पोलिस ठाण्यात त’क्रा’र दाखल केली होती. त्यांनतर या संबंधी पोलिसांनी शुभम आणि त्याच्या भावाला पोलिस ठाण्यात आणले होते आणि त्यांची चौकशी केली. मात्र, काहीच पुरावा नसल्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना सोडले.

या घटनेनंतर शुभमने सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. त्याने कष्ट करून 11 हजार रुपये जमा केले आणि एक कॅमेरा खरेदी केला आणि त्याच्या दुकानात लावला. त्यानंतर त्याने जवळच असेलल्या भावाच्या कपड्यांच्या दुकानात टीव्ही लावला.

चो’री’च्या आ’रो’पा’मु’ळे दोघा भावांच्या सन्मानाला इजा पोहचली आहे, असे दोन्ही भाऊ म्हणाले. आता इथून पुढे त्यांच्यावर अशा प्रकारच्या चो’री’चा आ’रो’प होऊ नये वा असे झाल्यास तो आपला प्रामाणिकपणा सिद्ध करू शकतो. त्यानंतर शुभम परीसरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील ही घटना तुफान व्हायरल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page