तीन मित्रांनी 1500 रुपयाला जुना सोफा खरेदी केला, त्यातून निघाले असे काही की पाहून..

कधी लोकांचे नशीब पालटेल याचा काही नेम नाही. रातोरात लोकांचे नशीब चमकलेले अनेक उदाहरणं आहेत. नशीब कधी कोणता च’म’त्का’र करेल हे काही सांगता येत नाही. आज आपण अशी एक घटना पाहणार आहोत ज्यात तीन मित्रांना लाखो रुपये काहीही न करता मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2019 मधील असून एकदा तीन मित्र जुना सोफा घेऊन घरी आले आणि त्यातून असे काहीतरी बाहेर आले जे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अमेरिकेमधील पल्ट्स येथील स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेले तीन मित्र रीज वर्खोव, कोली गस्टी आणि लारा रुसो यांनी राहण्यासाठी एक खोली भाड्याने घेतली होती. त्यांनतर त्या तिघांनी मिळून 1500 रुपयात एक सोफा खरेदी केला होता.

त्यानंतर एके दिवशी तिघेही मित्र सोफ्यावर टीव्ही पाहत बसले असताना त्यांना सोफ्यात काहीतरी आहे असे जाणवले. ज्या भागात त्यांना काहीतरी आहे असे वाटत होते तिथला भाग त्यांनी बाहेर काढला. त्यानंतरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्यात चक्क एक हजार डॉलर म्हणजेच सत्तर हजार रुपये होते. हे पैसे पाहून त्यांना सुरुवातीला मोठा धक्का बसला. मात्र, पुढे त्यांनी संपूर्ण सोफ्याचे एकामागून एक असे अनेक भाग काढले. अशा प्रकारे त्या सोफ्यातून त्यांना तब्बल 41 हजार डॉलर्स म्हणजेच 29 लाख रुपये रक्कम सापडली. या तिघा मित्रांनी केवळ 1500 रुपयात घेतलेल्या त्या सोफ्यातून त्यांना लाखो रुपये प्राप्त झाले. एवढी मोठी रक्कम पाहून त्यांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.

त्यांनतर त्या तिघांनीही पुन्हा संपुर्ण सोफा चेक केला तेव्हा त्यांना त्यात एक डिपॉझिट स्लिप सापडली. यानंतर या तिघांनीही प्रामाणिकपणे हे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. त्या स्लिपमध्ये लिहिलेल्या मालकाचा त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनतर त्यांना एक पत्ता सापडला आणि ते तिघेही त्या पत्त्यावर गेले तर तिथे एक वृद्ध बाई राहत होत्या.

त्या वृध्द महिलेने सांगितले की, त्यांच्या पतीच्या सेवानिवृत्तीचे ते पैसे होते आणि ते एका बँकेत जमा करायचे होते. परंतु काही कारणास्तव ते बँकेत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ते पैसे सोफ्यात लपविले. मात्र, त्यांनतर त्यांच्या मुलांनी त्यांना काहीही न सांगता तो सोफा विकला.

जेव्हा सोफा विकला गेला हे त्या वृध्द महिलेला समजले तेव्हा त्यांना आपले पैसे कधीच परत मिळणार नाहीत असे वाटले. मात्र, तीन मित्र प्रामाणिकपणे पैसे परत करण्यासाठी आले म्हणून त्यांनी त्या तीन मित्रांना एक हजार डॉलर्स म्हणजेच 70 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. ही घटना सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान व्हायरल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page