या शेतकऱ्याने शेतीत केला हा थोडासा बदल आणि आज वर्षाला तब्ब्ल 35 लाख कमवत आहे! वाचा कसे केले हे शक्य..

आजकाल शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यातील 45 वर्षीय तुकाराम गुंजाळ यांनी देखील आपल्या चुलत भावांसोबत त्यांच्या 12 एकर शेतजमिनीत मेहनत करून दिवस काढले. जसे इतर लोक करतात तसे त्यांनी देखील पारंपारिक शेती केली आणि कांदा, गहू, ऊस आणि इतर हंगामी भाजीपाला यासारखी पारंपरिक पिके घेतली.

परंतु ही पिके घेतल्याने त्यांच्या उत्पनात कोणताही फरक पडला नाही. अशी शेती करताना त्यांना अनेक मर्यादा येतात, याविषयी तुकाराम म्हणतात कि, “आमच्या एकूण मिळकतीपैकी सुमारे 70% पैसे हे मजुरांच्या मजुरीवर आणि इतर गोष्टीवर खर्च होतात. आम्ही करत असेलला खर्च हा आमच्या कमाईपेक्षा जास्त होता. त्यामुळे यावर तोडगा म्हणून पिकामध्ये बदल करणे आवश्यक होते.”

शेवटी या परिस्थितीला कंटाळून त्यांनी पिकांवर वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यांची सुरवात त्यांनी 2 एकर जमिनीवर केली आणि त्यामध्ये रोटेशन पद्धतीने टोमॅटो, झेंडू आणि दुधीची या पिकांची लागवड करण्यास सुरवात केली.

यासोबतच त्यांनी मल्चिंग, ठिबक सिंचन आणि इतर शेतीच्या पद्धती अवलंबल्या ज्यामुळे रासायनिक खते आणि की’ट’क’ना’श’कां’वर होणाऱ्या खर्चात बचत झाली. आज, याचाच परिणाम म्हणून तुकाराम त्यांच्या 12 एकर जमिनीतून 35 लाख रुपये कमावत आहेत.

त्यांची पद्धत समजावून सांगताना तुकाराम म्हणतात कि, “आम्ही मे महिन्यात आमचे शेत नांगरतो आणि शेण आणि पोल्ट्री वेस्टच्या सहा ट्रॅक्टरने जमीन तयार करून घेतो. यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही झेंडूचे पीक घेतो. यानंतर यांची सप्टेंबरमध्ये कापणी केली जाते आणि पुढचे पीक, म्हणजे टोमॅटो, हे ऑक्टोबरच्या सुरुवातीला घेतले जाते. यानंतर टोमॅटोची कापणी होत आली कि, आम्ही दुधीची लागवड सुरू करतो.”

“प्रत्येक पिकाच्या कापणीचा कालावधी हा दीड ते दोन महिन्यांचा असतो. पहिल्या कापणीच्या वेळी जर बाजारात दर चांगले नसतील तर दुसऱ्या कापणीच्या काळात ते सुधारतात. यामुळे आम्ही बाजारातील शेतमालाचे नियोजन करतो आणि त्यांच्याप्रमाणे इतर प्रदेशातून पुरवठा कमी असताना माल तिकडे पाठविला जातो.”

“उदाहरण देऊन सांगायचे झाले तर टोमॅटोला सुरत, पुणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच गुजरात मधील मोठ्या शहारत झेंडूच्या फुलांना जास्त दर मिळतो.” मल्चिंग आणि ठिबक सिंचनाबरोबरच त्यांनी एक कोटी लिटर पाणी साठवण क्षमता आणि दोन विहिरी असलेले शेततळे उभारले आहे असे तुकाराम सांगतात. पाणीपुरवठा पुरेसा आणि अखंडित असावा असे त्यांचे मत आहे. पाण्याचा योग्य वापर, योग्य संसाधने आणि पुरेसा पाणी पुरवठा यामुळे उत्पादनात वाढीची हमी देता येते.

त्यांचे हे यश पाहून इतर राज्यातील शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असल्याचे तुकाराम सांगतात. “आम्ही ज्या शेती पद्धतीचा अवलंब करत आहे, ते समजून घेण्यासाठी ते काही दिवस इकडे राहतात. काही लोकांकडे तर 200 एकर जमीन आहे तरीही ते आमच्या सल्ल्यासाठी इकडे भेट देतात.

तुकाराम प्रत्येक शेतकऱ्याला हाच सल्ला देतात की, “आपली जमीन चांगली तयार करा आणि आपल्या शेतीकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. शेतकऱ्याने आपल्या प्रयत्नांशी तडजोड न करता शिस्तीचे पालन केले तर त्याला नक्कीच यश मिळते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page