आईचे छत्र हरवले, वडिलांनी रिक्षा चालवून मुलाला शिकवले, मुलाने आर्मीत भरती होऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले..

अनेकवेळा व्यक्तीची परिस्थिती त्याच्या यशाला कारणीभूत असते. कारण जेव्हा एखादा व्यक्ती गरीब कुटुंबातील असतो तेव्हाच तो मोठी स्वप्ने बघतो आणि हि स्वप्ने त्याला झोपू देत नाहीत आणि तो त्या दिशेने हालचाल करण्याचे प्रयत्न करतो. असेच एक स्वप्न पहिले होते कोल्हापूरच्या सार्थक धवन यांनी.

सार्थक धवन हे कोल्हापूरच्या ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 136 व्या अभ्यासक्रमात एकूण गुणवत्ता यादीत ते चौथे आले होते. लष्करी प्रशिक्षणातही उत्कृष्ट कामगिरी करणारा सार्थक एनडीएमधून उत्तीर्ण झाला आहे.

सार्थक धवन हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. वडील ऑटो रिक्षा चालवून कसेतरी कुटुंबाला हातभार लावत होते. परंतु सार्थक धवन यांना आपली घरची परिस्थिती चांगलीच माहित होती आणि यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण या एकमात्र उपाय आहे हे देखील त्यांना माहित होते.

अचानक त्यांच्या आईचे देखील नि’ध’न झाले. त्यावेळी तर ते मात्र पूर्णपणे खचून गेले होते, परंतु त्यांनी या दुःखाला तोंड देत आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. वडिलांनी देखील त्यांच्या अभ्यासात कोणतीही कमतरता सोडली नाही. शेवटी मेहनत करून त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

“माझ्या मुलाने आज आमचा अभिमान वाढवला आहे. हे आमच्यासाठी एक स्वप्न सत्यात उतरले आहे,” असे त्यांचे वडील म्हणाले. शशिकांत गेल्या तीन दशकांपासून कोल्हापुरात ऑटो रिक्षा चालवतात. ते पूर्ण श्रेय त्यांच्या मुलाच्या इच्छेला देतात, जो त्याच्या आईचा एका दुःखद रस्ता अ’प’घा’ता’त मृ’त्यू झाला तेव्हाही डगमगला नाही.

“आईच्या जाण्याचा हा धक्का खूप मोठा होता, पण त्याने अभ्यासातून आपले लक्ष हटवले नाही आणि पहिल्याच प्रयत्नात एनडीएचे प्रवेशद्वार स्वतःसाठी खुले केले. आता तो लष्करी अधिकारी झाला आहे आहे,” शशिकांत पुढे म्हणाले.

रोमियो स्क्वाड्रन कॅडेट असलेल्या सार्थकने कोल्हापुरातील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि औरंगाबादमधील सर्व्हिसेस प्रीपरेटरी स्कूल (एसपीएस) मधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. आर्मी ऑफिसर होण्याचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते, असे ते म्हणाले. “म्हणून, मी शाळेत महाराष्ट्र कॅडेट कॉर्प्स (MCC) मध्ये सामील झालो आणि NDA प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी SPS मध्ये शिकलो, सार्थक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page