मित्रांसोबत कार खरेदी करून घरी परतत होता, गावापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असतानाच कर झाडाला धडकली..

दिवसेंदिवस रस्ते अ’प’घा’तां’ची संख्या वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे. रोज एक ना एक अ’प’घा’ता’ची बातमी समोर येत असते. नुकतीच एक घटना उत्तर प्रदेश येथून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील देवरीया जिल्ह्यातील कारुआना गावात राहणारा 25 वर्षीय कृष्णा वर्मा हा शुक्रवारी गोरखपूर येथील बरहलगंज मध्ये सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी गेला होता.

तेथे त्याने स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली आणि तो तेथून आपल्या गावी परतत होता. तेव्हा त्याच्या समवेत विकास सिंह, शुभम वर्मा आणि छोटू वर्मा असे त्याचे तीन मित्र कार मध्ये होते. बरहलगंज येथून परतत असताना शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास गावापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असताना त्यांचावर काळाने घा’ला घातला.

घरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या सिवरी गावाजवळ कृष्णा वर्मा यांच्या गाडीचा वेग जास्त असल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार भरधाव वेगात थेट झाडावर जाऊन आदळली.

या घटनेची माहिती मिळताच भलुआनी पोलीस घटनस्थळी दाखल झाले. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी थेट झाडात घुसली होती. त्यामुळे गाडीतून बाहेर पडणं कोणालाही शक्य नव्हते. यामुळे गॅस क’ट’र’च्या मदतीने कारचा पत्रा कापण्यात आला आणि सगळ्यांना बाहेर काढण्यात आले.

या अ’प’घा’ता’म’ध्ये कारचा चूरडा झाला असून या दु’र्दै’वी अ’प’घा’ता’त कार चालक कृष्णा वर्मा याचा जागीच अं’त झाला आहे. तर त्याचे तीन मित्र गंभीर रित्या जखमी झाले आहेत. तिघांनाही तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे शुभम वर्मा आणि छोटू वर्मा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मेडिकल कॉलेज गोरखपूर येथे दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page