कॅब मधून तपासणीसाठी रुग्ण्यालयात जात असताना अचानक झाली महिलेची प्र’सू’ती, कॅब कंपनीचे बिल पाहून महिलेला बसला धक्का

आपण अनेकदा ट्रेनमध्ये, बसमध्ये महिलेने बाळाला जन्म दिल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. आज आपण जी घटना पाहणार आहोत, त्यात एका महिलेने बाळाला चक्क कॅब मध्ये जन्म दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील रहिवासी असलेली 26 वर्षीय फराह कॅकेनडिन ही महिला ग’रो’द’र होती. त्यामुळे आपल्या नियमित तपासणीसाठी ती रूग्णालयात निघाली होती. ती कॅबने रूग्णालयात जात होती.

यादरम्यान अचानक फराहला प्र’सू’ती कळा सुरू झाल्या आणि त्याच वेळेस तिने कॅबमध्येच बाळाला जन्म दिला. फराह ने प्र’सू’ती कळा सुरू झाल्या तेव्हा तिने रुग्णवाहिकेसाठी रूग्णालयामध्ये फोन केला होता. परंतु, रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नव्हती.

तोपर्यंत प्र’सु’ती झाल्यानंतर फराह स्वत: कॅबमधून रुग्णालयात पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर रुग्णालयातील परिचारिकांनी फराहला तात्काळ पुढील उपचारासाठी आत नेले. फराहने जन्म दिलेल्या बाळाला तिच्या जॅकेटमध्ये लपेटून आणले होते.

यानंतर पुढे काही दिवसांनी फराहला कॅब कंपनीचे ट्रॅव्हल बिल मिळाले. ते बिल पाहून ती चकित झाली. अवघ्या 20 किमीपेक्षा ही कमी अंतर असलेल्या प्रवासासाठी कॅब कंपनीने तब्बल 8 हजार 568 रुपयांचे बिल आकारले होते. तिने गाडीत बाळाला जन्म दिल्यामुळे फरहला एकूण पैशांपैकी तब्बल 5 हजार 713 रुपये हे केवळ सफाई चार्ज म्हणून घेण्यात आले होते.

फराह सांगते की, “त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की त्यासाठी दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता. मी समजू शकते मात्र, अशा परिस्थितीमध्ये असतानाही कॅब कंपनीने एवढे बिल आकारणे खूप चुकीचे आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page