हमाली करून वडिलांनी मुलीला शिकवले, मुलीने MPSC परीक्षेत यश मिळवून वडिलांचे हमालाची ओझे कमी केले..

आपण शिकून मोठे व्हावे आणि घरची आर्थिक परिस्थिती बदलावी असे स्वप्न इतर अनेक तरुणांप्रमाणे कोल्हापूरच्या एका हमालाच्या लेकीने देखील पाहिले होते. यासाठी तिने दिवसरात्र मेहनत देखील घेतली आणि MPSC परीक्षा उत्तीर्ण करून तिने तिचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ही प्रेरणादायी गोष्ट आहे रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ हिची, जी एका हमालाची मुलगी आहे.

मागील महिन्यात MPSC च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले होते. यामध्ये रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ ही ओबीसी महिलांच्या गटात राज्यात पहिली आली आहे. गावातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने तळाशी येथे आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

यानंतर रेश्मा हिने डिप्लोमा करण्याचे ठरवले आणि मेकॅनिकल मध्ये आपला डिप्लोमा पूर्ण करून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये अभ्यास करत असतानाच आपण देखील परीक्षा देऊन सरकारी अधिकारी व्हायचे असे तिने ठवरले होते.

आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासात लावले. सुरवातीला तिला काही गुणांनी अपयश हाती आले पण तीने हार मानली नाही आणि पुढच्या वेळी दुपटीने मेहनत घेतली. शेवटी तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणी तिने राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परिक्षेत आपल्या यशाचा झेंडा रोवला.

आपल्या या यशामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा असल्याचे रेश्मा सांगते. तिचे वडील बाजीराव ऱ्हाटोळ हे एका साखर कारखान्यात हमालीचे काम करून कुटुंब चालवतात. असे असले तरी त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. त्यांनी नेहमीच मुलांना शिक्षणासाठी पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page