पवई फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याच्या घराचे कधीही न पाहिलेले फोटो

“महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कॉमेडी कार्यक्रमाने आजवर आपले निखळ मनोरंजन केले आहे. तसेच या कार्यक्रमातुन अनेक हरहुन्नरी कलाकार देखील मराठी सृष्टीला लाभले आहेत. असाच एक कलाकार जो त्याच्या विनोदाच्या टायमिंगने सर्वांना खळखळून हसवतो आणि तो म्हणजे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे.

गौरवने मालिका, चित्रपट, व्यावसायिक नाटक, एकांकिका यातून आपल्या सर्वांचे मनोरंजन केले आहे. पवई फिल्टरपाडा येथे राहणाऱ्या गौरव मोरेची सुरवात एकांकिकाच्या माध्यमातून झाली होती. प्रसाद खांडेकर सोबत त्याने ‘पडद्याआड’ ही एकांकिका केली होती.

यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनी पुढे एकत्र काही नाटके आणि स्किट देखील केले. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्याने आपल्या पदार्पण केले आणि यात तो विनोदी भूमिका साकारत होता. तसेच तो रंगभूमीवर देखील काम करत होता.

त्याचे दर्जेदार काम पाहून त्याला हिंदी चित्रपट सृष्टीत देखील काम करण्याची संधी मिळाली. झोया फॅक्टर, संजू, कामयाब या हिंदी चित्रपटात त्याने काम करून त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. कुठेही थांबायचे नाही हे ठरवून त्याने काम केले असे तो सांगतो.

काहीच दिवसांपूर्वी तो त्याच्या एका मराठी चित्रपटासाठी लंडनला देखील गेला होता. यावेळी देखील अनेकांनी त्याच्या या यशाचे कौतुक केले होते. सध्या “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमातुन तो आपल्या सर्वांचे मनोरंजन करत आहे आणि त्याला प्रेक्षकांचे देखील प्रेम मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page