पाहा “चला हवा येऊ द्या” फेम कुशल बद्रिकेच्या घराची मराठमोळी मांडणी! पाहून मनाला भुरळ पडेल..

अभिनेता कुशल बद्रिके हा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. त्याने आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांचे मनोरंजन केले आहे. आज सो’श’ल मी’डि’या’व’र’ही त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. पण अर्थातच त्याचा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. मात्र, या सगळ्यात त्याला त्याच्या कुटुंबियांनी तसेच त्याची पत्नी सुनयनाची खंबीर साथ मिळाली आहे.

कुशल कायम सो’श’ल मी’डि’या’वर सक्रिय असतो आणि या माध्यमातून तो चाहत्यांशी संवादही साधत असतो. तो नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत नवनवीन पोस्टही शेअर करत असतो. तो नेहमीच त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सो’श’ल मी’डि’या माध्यमातून शेअर करताना आपल्याला दिसतो. अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट तुफान व्हायरल देखील होत असतात.

कुशलचा आतापर्यंतचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. कुशलचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला असून तो तिथेच वाढला. कुशल हा फिल्मी बॅकग्राऊंड असणाऱ्या कुटुंबात जन्माला आला नव्हता. मात्र, शाळा कॉलेजमध्ये तो अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा आणि त्यात अभिनय करायचा. इथूनच त्याच्या अभिनयाची पाळंमुळं रोवली गेली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी थेट मुंबईला आला.

यांनतर त्याने काही नाटकांमध्ये काम केले आणि तिथून त्याला मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली. त्यांनतर त्याने फू बाई फू या कॉमेडी शोमध्ये काम केले. तसेच अनेक चित्रपटांमध्ये ही त्याने उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. आता त्याला ‘चला हवा येऊ द्या’ ह्या शो मुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचे विनोदाचे टाईमिंग परफेक्ट आहेच पण अभिनेता म्हणूनही तो एक उत्तम कलाकार आहे.

कुशलने स्ट्रगल करत आपले नाव कमावले आहे. त्याच्या या काळात पत्नी सुनयनाने उत्तम साथ दिल्याचेही कुशल नेहमी सांगत असतो. हीच गोष्ट त्याच्या घराची आणि संसाराचीदेखील आहे. त्याने अत्यंत कष्टाने घर घेतले आहे आणि ते तितक्याच प्रेमाने सजवले देखील आहे. कुशलच्या घराची मांडणी टिपिकल महाराष्ट्रीयन घराप्रमाणे आहे. साधी पण मनमोहक अशी ही मांडणी आहे.

जवळपास सगळ्याच महाराष्ट्रीयन घरात तुळस असते. त्याप्रमाणेच कुशलच्याही घरात तुळस असून ती अत्यंत लक्षवेधी आहे. ती केवळ कुंडीत नसून त्यावर विठुमाऊलीचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. पिवळ्या पितांबरातील विठूराया आणि त्यावर असणारी तुळस ही खूप लक्षणीय आहे.

त्यांच्या घरात कोणताही फापटपसारा नसून अत्यंत साधी अशी लिव्हिंग रूम आहे. लक्षवेधी आणि युनिक अशी दीपमाळ त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये लावली असून संपूर्ण दिवसभर प्रकाश येऊ शकेल आणि इलेक्ट्रिसिटीची जास्त गरज भासणार नाही अशा पद्धतीने घराची बाल्कनी आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अत्यंत ताजेतवाने वाटत असणारच.

तसेच बेडरूम आणि लिव्हिंग रूम दोन्हीकडे एका कोपऱ्यात लहानसा सोफा ठेऊन मागच्या भिंतीला ऑफ व्हाईट रंग दिलेला आहे. त्यावर रंगबेरंगी छोट्या-मोठ्या फ्रेम्स लावल्या आहेत त्यामुळे त्याला अधिक शोभा येत आहे. तसेच त्याच्या घरातील टेलिफोन तर विशेष लक्षवेधी आहे. त्यामुळे घरात आल्यानंतर प्रत्येकाचे अशा गोष्टींकडे पटकन लक्ष जाते.

बाल्कनी मध्ये डिझाईनचे झोपाळा न लावता साधा लाकडी झोपाळा लावला आहे. इथे तो तासनतास बसून वेळ घालवत असतो. मराठमोळं घर आणि लाकडी झोपाळा हे खरोखरच एक उत्तम समीकरण आहे. तसेच बाल्कनीमध्ये फोल्डिंग टेबल त्याने ठेवले आहेत. तिथे बसून कुशल आणि त्याची पत्नी दिवसभराचा शीण घालवत असतात. चहा-कॉफी आणि गप्पा असा मस्त वेळ ते एकमेकांसोबत घालवत असतात.

अगदी मराठमोळं, साधं आणि आकर्षित करणारं असे हे कुशलचे घर आहे आणि घराची ही मनमोहक सजावट या दोघांनी उत्तमरीत्या केली आहे. घरात प्रवेश केल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वाटत असणार, यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page