जोपर्यंत मी आयएएस होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असे व्रतच घेतले, तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS अधिकारी

अनेक ठिकाणी मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना अपेक्षित शिक्षण देण्यापासून वंचित ठेवले जाते. मुलींना आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेऊ दिले जात नाही. तसेच त्यांचे लवकर लग्न लावून दिले जाते. कुटुंबातील सदस्य मुलींवर लग्नासाठी दबाव टाकत असतात. त्यामुळे अनेक मुली आपली प्रतिभा दाखवू शकत नाहीत.

मात्र, काही मुली कुटुंब आणि समाजाच्या दबावाला ब’ळी न पडता त्यांची स्वप्न पूर्ण करण्याला अधिक प्राधान्य देत असतात. आज आपण अशाच एका मुलीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी लहानपणापासून आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते. यात विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी आयएएस होईपर्यंत लग्न न करण्याचे व्रत घेतले होते.

आयएएस होईपर्यंत लग्न न करण्याच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय संतप्त झाले होते मात्र, त्यांनी कुटुंबालाही राजी केले आणि शेवटी त्या आयएएस झाल्या. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करून आपल्या कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली ​​आहे. आपण ज्या आयएएस अधिकारी बद्दल बोलत आहोत त्या बिहारच्या रहिवासी असलेल्या अभिलाषा यांच्याबद्दल. त्या  लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यामुळे त्यांना वाचनाची खूप आवड निर्माण झाली होती.

अभिलाषा यांनी पाटणा येथून सीबीएसई बोर्डातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले आणि परीक्षेत त्या प्रथम देखील आल्या. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना यूपीएससी परीक्षांची माहिती मिळाली होती. त्यावेळेस यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच आपण आयएएस अधिकारी बनू शकतो हे त्यांना समजले.

अभिलाषा यांनी अकरावीत असताना आयएएस अधिकारी बनण्याचा निश्चय घेतला होता. यानंतर, त्यांनी बारावी मध्ये 84 टक्के गुण मिळवले. पुढे त्यांनी ए. एस पाटील कॉलेज महाराष्ट्र मधून बी.टेकचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी आपला यूपीएससी परीक्षेचा अभ्यास चालूच ठेवला होता. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीला जोमाने सुरूवात केली होती.

यादरम्यान, पदवीचे शिक्षण घेत असताना अभिलाषा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरवले होते आणि त्यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर दबाव टाकत होते. यादरम्यान, अनेक नातेवाईक घरी येऊ लागले होते. त्यामुळे अभिलाषा खूप अस्वस्थ झाल्या होत्या. या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या अभ्यासावर वाईट परिणाम होत होता. त्यांना या गोष्टी असह्य झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी अखेर कुटुंबीयांना आपला निर्णय सांगण्याचे ठरवले.

त्यांनतर, अभिलाषा यांनी आपल्या आई -वडिलांना सांगीतले की, “मला आताच लग्न करायाचे नाही. मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे. आयएएस अधिकारी झाल्यानंतरच मी लग्न करेन असे मी व्रत घेतले आहे.” हे ऐकून कुटुंबातील सर्व सदस्य अभिलाषा यांच्यावर चिडले, परंतु अभिलाषा या त्यांच्या मतावर ठाम होत्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला हळुहळू राजी केले.

त्यांनी अनेक उदाहरणे देऊन त्यांच्या कुटुंबाला समजावून सांगितले. अखेर खूप समजवल्यानंतर त्यांचे कुटुंबीय राजी झाले आणि त्यांना यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास पाठिंबा दिला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे नोकरी देखील केली. नोकरी करत असताना देखील त्या ऑफिसमध्ये उरलेल्या वेळेत मोबाईलद्वारे अभ्यास करत असत. तसेच रात्री घरी आल्यानंतर त्या रात्री उशिरापर्यंत जाग्या राहून अभ्यास करत असत.

अभिलाषा यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा युपीएससी परीक्षा दिली. मात्र, त्यांना त्यात यश मिळाले नाही. परंतू, त्यांनी हार न मानता पुढील एक वर्ष तयारी केली आणि कठोर अभ्यास करून दुसऱ्यांदा परिक्षा दिली. तेव्हा त्यांचा 308 रँक आला आणि त्यांची IRS पदी निवड झाली.

मात्र, यावर त्या समाधानी नव्हत्या. म्हणून त्यांनी जोमाने तयारी केली आणि अखेर जिद्दीच्या जोरावर अभिलाषा तिसऱ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी झाल्या. आज त्या अनेक मुलींसाठी एक उत्तम उदाहरण बनल्या आहेत. त्यांनी यश मिळवून समजासमोर एक चांगला आदर्श देखील ठेवला आहे. त्यांनी हे दाखवून दिले आहे की, मुलींना त्यांच्या आवडत्या अभ्यासाची तसेच नोकरी करण्याची संधी मिळाली तर त्या नक्कीच यश संपादन करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page