नवऱ्याच्या गेल्यानंतरही सुनेने सासूची खूप सेवा केली, सासूने वि’ध’वा सुनेला मुलगी मानून तिचा पुनर्विवाह केला..

सासू-सुनेचे नाते एकमेकांमधील दो’ष शोधण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे सासूला आपल्या सुनेला स्वतःपेक्षा कमी ठेवायचे असते आणि त्यांच्यात प्रेम कधीच दिसत नाही. मात्र नवसारी येथील एका सासूने आपल्या सूनला मुलगी मानून वि’ध’वा झाल्यानंतर तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून समाजात आदर्श निर्माण केला. सुनेला सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून वागवण्याची प्रेरणा यातून लोकांना मिळाली आहे.

हि गोष्ट नवसारीच्या घांची समाजातील मूळ रहिवासी असलेल्या जया अमृत गांधी यांच्याबद्दल आहे, ज्यांच्या मुलाचा तीन वर्षांपूर्वी संगणक वर्ग घेत असताना हृ’दय’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने मृ’त्यू झाला. त्यामुळे त्यांची पत्नी स्वीटी या वि’ध’वा झाल्या. त्यावेळी त्यांना नऊ वर्षांचा मुलगा होता. जो आज बारा वर्षांचा झाला आहे. मात्र, स्वीटी यांनी सासू-सासऱ्यांसोबत राहून कुटुंबाची सेवा केली.

रोज घरात सून पाहून त्यांना वाटायचे की ही सून माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी वि’ध’वा असेल तर तिला घरात ठेवायचे का? त्यामुळे जया यांनी त्यांच्या सुनेचे लग्न दुसऱ्यासोबत करण्याचा विचार केला आणि चांगला मुलगा शोधायला सुरवात केली.

ज्यामध्ये सुरतमधील उधना येथे राहणाऱ्या दिव्येश भरुचा नावाच्या तरुणाची त्यांच्या सासूने जावई म्हणून निवड केली होती. दिव्येश यांची पत्नी आणि आईचा दीड वर्षांपूर्वी मृ’त्यू झाला होता. त्यावेळी हा तरुण एका चांगल्या ठिकाणी कामाला होता आणि आता तो एकटाच होता.

त्यामुळे सासूने आपल्या सुनेला या तरुणाशी संवाद साधायला लावला, त्यांची भेट घेतली आणि दोघांनीही एकमेकांना पसंत केले. सासूचा आशीर्वाद घेऊन स्विटी यांनी दिव्येशसोबत सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page