11 वीत असताना आईचे नि’धन झाले, परीक्षेसाठी शेतजमीन गहाण ठेवली, मेहनत करून माधव IAS अधिकारी बनले..

UPSC परीक्षा पास होणे हे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असतो तोच विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकतो. आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका उमेदवाराबद्दल सांगणार आहोत ज्याने आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी घर गहाण ठेवले होते.

ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माधव गित्ते यांची. त्यांनी कठोर परिश्रम करून UPSC परीक्षेत 210 वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी झाले. त्यांचे कुटुंब हे शेतकरी कुटुंब होते. घरची परिस्थिती ही हलाखीची होती. अशातच ते 11वीत असताना त्यांच्या आईचे नि’धन झाले.

आई गेल्यानंतर कुटूंबाची अवस्था आणखी बिकट होत गेली. यानंतर त्यांना पूर्ण वेळ शेतात काम करावे लागले. यातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षण हे महत्वाचे आहे हे माधव यांना माहीत होते म्हणून त्यांनी सरकारी शाळेतून 12विचा फॉर्म भरला. 12 वीत त्यांना 56% मिळाले होते.

पुढे त्यांनी कसेतरी पैसे जमा करून डिप्लोमा केला आणि चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले. पण पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी त्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि आपले शेत गहाण ठेवून त्यांनी कॉलेजची फी भरली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी चांगली नोकरी मिळवली आणि आपले कर्ज फेडण्यास सुरवात केली. तेवढ्यात त्यांनी एका व्यक्तीची UPSC ची मुलखात पाहिली आणि UPSC कडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी माहिती गोळा केली तयारीला सुरुवात केली.

त्यांनी नोकरी सोडून परीक्षेची तयारी केली आणि यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप मदत केली. सुरवातीला त्यांना 2017 मध्ये परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही पण 2018 साली त्यांची इंडियन ऑडिट आणि अकाउंट्स साठी निवड झाली पण त्यांना IAS बनायचे होते.

शेवटी त्यांच्या मेहनतीला यश आले आणि 2019 साली त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांना IAS पद मिळाले. त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना सल्ला दिला की आपले मार्गात अडथळे आले तरी मागे हटू नका आणि आपली आशा सोडू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page