वयाच्या 5 व्या वर्षी डोळ्यांची दृष्टी गेली, तरीही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, आता आहे IAS अधिकारी..

कोणतेही यश मिळविण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी होत नाही, तोपर्यंत तो ध्येय प्राप्त करण्याच्या मार्गापासून भरकटतच राहतो. बहुतेक लोक जीवनात येणाऱ्या आव्हानांचा त्याग करतात. असा विचार करणाऱ्यांसाठी आजची कथा प्रेरणादायी आहे.

ही गोष्ट एका मुलीची आहे जिने आपली दोन्ही दृष्टी गमावूनही UPSC ची तयारी केली आणि चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. पूर्णा संथ्रीने अखिल भारतात 286 वा क्रमांक मिळवला. अपयश आणि अडचणींना कंटाळून हार मानणाऱ्यांसाठी त्यांनी आदर्श ठेवला आहे.

पूर्णा यांचे वडील खाजगी कंपनीत नोकरी करतात आणि त्यांची आई गृहिणी आहेत. पूर्णा 5 वर्षांच्या असताना त्यांची दृष्टी कमी होऊ लागली. पूर्णाच्या पालकांनी त्यांच्या डोळ्यांवर मदुराई येथील अरविंद आय हॉस्पिटलमध्ये उपचार केले. तेथे डॉक्टरांनी सांगितले की पूर्णा दुर्मिळ डि’ज’न’रेटिव्ह वि’काराने ग्रस्त आहेत. त्यानंतर हळूहळू काळाच्या ओघात पूर्णा यांचा उजवा डोळा पूर्णपणे आंधळा झाला.

त्यानंतर पूर्णा यांच्या डाव्या डोळ्याचा बचाव करण्यासाठी त्यांनी श’स्त्र’क्रिया केली, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. त्यांची श’स्त्र’क्रिया यशस्वी झाली नाही. कालांतराने त्यांची दृष्टी कायमची गेली आणि त्या अंध झाल्या. डोळ्यांशिवाय जीवन जगणे किती कठीण आहे याची आपण सर्वजण कल्पना करू शकतो. पण पूर्णा यांनी हार मानली नाही.

पूर्णा यांनी सांगितले की, जेव्हा त्या 11वीत होती तेव्हा त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. टी उदयचंद्रन आणि यू सगायम सारख्या आयएएस अधिकाऱ्यांबद्दल ऐकून त्यांना नागरी सेवा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. पण UPSC तयारीचा प्रवास तितका सोपा नव्हता.

दृष्टी गमावल्यामुळे पूर्णाला त्यांच्या अभ्यासात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पूर्णा यांच्या या खडतर प्रवासात त्यांच्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी खूप मदत केली आणि ते नेहमी पूर्णा यांच्या सोबत राहिले.

पूर्णा सांगतात की “त्यांना ऑडिओ फॉरमॅटमध्ये अभ्यास करण्याच्या सर्व सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे आई-वडील त्यांच्यासाठी रात्रंदिवस पुस्तके वाचायचे. त्यांच्या काही मित्रांनी पुस्तकांचे ऑडिओ स्वरूपात रूपांतर करण्यास मदत केली.”

पूर्णाच्या मैत्रिणींनीही त्यांना नेटवरून आवश्यक अभ्यास साहित्य शोधण्यात मदत केली. त्या सर्वांचे सहकार्य आणि मेहनत यामुळेच मी आज आयएएस अधिकारी बनले आहे,” असे पूर्णा म्हणाल्या.

पूर्णा यांनी 2016 पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली होती. UPSC मध्ये, पूर्णा यांनी सलग तीन वेळा अपयशाची चव चाखल्यानंतर चौथ्या प्रयत्नात 2019 मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. त्यांनी अखिल भारतीय 285 वा क्रमांक मिळवला. पूर्णा त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या पालकांना देतात. पूर्णा यांना शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page