जागा निघत नसल्याने स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला आणि चहावाला झाला! आता महिन्याला करत आहे सुमारे दीड लाखांची उलाढाल..

दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असतात. स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. यासाठी ते दिवसरात्र मेहनतीने अभ्यास करत असतात. मात्र, यामध्ये सर्वांनाच यश मिळते असे नाही. वाढती स्पर्धा तसेच जागांची कमी इत्यादींमुळे अनेकांना यात वर्षानुवर्षे कठोर मेहनत घेऊनही अपयश सहन करावे लागत असते.

अशा परिस्थितीमध्ये अनेक तरुण निराश होत असतात. तसेच यापैकी अनेक उमेदवार यातून बाहेर पडून दुसरे क्षेत्र निवडतात. अशाच प्रकारे औरंगाबादच्या तरुणाने काही वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनही नव्या जागा निघत नसल्याने त्याने चक्क चहावाला होण्याचे ठरवले. यातून तो महिन्याला 1 लाख 25 हजारांहून अधिक रुपयांची उलाढाल करत आहे.

शुभम तळणीकर आणि संकेत पालवे अशी या दोन तरुणांची नावे असून ते आज औरंगाबादमध्ये असलेल्या त्यांच्या ‘चाय मेकर्स’ या व्यवसायाच्या माध्यमातून लोकप्रिय झाले आहेत. हे दोन्ही तरुण मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या गावचे रहिवासी आहेत. या दोघांनी औरंगाबादमध्ये बीएससीचे शिक्षण पूर्ण केले.

यांनतर संकेत पालवे याने पुण्यात जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याने दोन-तीन वर्ष कठोर मेहनत घेऊन अभ्यास केल्यानंतरही जागा निघत नव्हत्या. तसेच शुभम हा पंजाबमधील एका कंपनीमध्ये मार्केटींगची नोकरी करत होता. या नोकरीमध्ये शुभमला समाधान वाटत नव्हते. त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करायाचा होता.

मात्र, यादरम्यान संपूर्ण भारतात निर्बंध लावण्यात आले. या संकटामुळे संकेतलाही स्पर्धा परीक्षेच्या जागा निघत नव्हत्या. त्यावेळी संकेतने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने शुभमलाही सोबत येण्यासाठी विचारले असता त्यानेही लगचेच होकार दिला.

यांनतर संकेत आणि शुभम यांनी औरंगाबादमध्ये चहा कॅफे सुरू करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी सुरुवातीला या कॅफेसाठी तब्बल 3 लाख रुपये खर्च करुन नागेश्वरवाडी या ठिकाणी कॅफेचा सेटअप उभारला. मात्र, हे दोघेही व्यवसायात नवीन होते तसेच त्यांना याचा कोणताही अनुभव देखील नव्हता. यामुळे सुरुवातीला त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा दोघांच्याही मनात ‘आपण चूक तर केली नाही ना’ असे विचार सतत घोळू लागले होते.

मात्र, हळुहळू त्यांच्या चहाची क्वालिटी, त्यांचे सातत्य या गोष्टींच्या जोरावर त्यांचा व्यवसाय वाढू लागला. यादरम्यान सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातूनही कॅफेची बरीच प्रसिद्धी होऊ लागली. अशा प्रकारे आता त्यांचा ‘चाय मेकर्स’ हा कॅफे सुरू होऊन सात महिने झाले आहेत. यात विशेष म्हणजे एवढ्या कमी काळात ते आता महिन्याला सुमारे दीड लाखांची उलाढाल करत आहेत.

अनेकांना उच्च शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी, मनासारखे उत्पन्न मिळत नाही. तसेच अनेकजण स्पर्धा परीक्षेचा खूप अभ्यास करतात मात्र, मर्यादित जागांमुळे सतत भविष्याबाबत चिंता लागलेली असते. हा सगळा अनुभव आम्हाला आल्यामुळे आम्ही हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आता या व्यवसायाला ग्राहकांची ही खूप पसंती मिळत आहे. यामुळे हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत, असे कॅफेचे मालक संकेत आणि शुभम यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page