ज्या कॉलेजमध्ये त्यांनी 20 वर्षे शिपाई म्हणून काम केले, आज त्याच कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर झाले..

एक ना एक दिवस मेहनत आणि जिद्दीचे फळ नक्कीच मिळते. कष्टाला शॉर्टकट नसतो, मार्ग किती लांबचा असेल, किती दिवस कष्ट करावे लागतील, किती अडचणी येतील याचा हिशोब नाही. तुम्हाला फक्त त्यावर टिकून राहावे लागेल. कमल किशोर मंडल यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे.

कमल किशोर यांची तिलका मांझी भागलपूर विद्यापीठाच्या (TMBU) आंबेडकर विचार आणि सामाजिक कार्य विभागात (पदव्युत्तर) सहायक प्राध्यापक पदासाठी निवड झाली आहे. कमल किशोर 20 वर्षांपासून या विद्यापीठात गार्ड म्हणून कार्यरत होते.

कमल किशोर मंडल, 2003 मध्ये, वयाच्या 23 व्या वर्षी, ते मुंगेरच्या RD&DJ कॉलेजमध्ये गार्डच्या नोकरीत रुजू झाले. राज्यशास्त्रात पदवीधर असूनही मंडल यांना पैशाची नितांत गरज असल्याने त्यांनी गार्ड म्हणून काम केले. मुंगेरच्या आर डी अँड डी जे कॉलेजमधून त्यांना तिलका मांझी भागलपुर विद्यापीठात पाठवण्यात आले. 2008 मध्ये त्यांना शिपायाची नोकरी देण्यात आली.

तिलका मांझी भागलपूर विद्यापीठात काम करत असताना कमल किशोर यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतर 2009 मध्ये त्यांनी एम.ए.ला प्रवेश घेतला. कमल किशोर एमए करून समाधानी नव्हते, त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडे तीन वर्षे विनंती केल्यानंतर त्यांना पीएचडी करण्याची परवानगी मिळाली. 2013 मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 4 वर्षांनी पीएचडी पूर्ण केली.

2020 मध्ये, राज्य विद्यापीठ सेवा आयोगाने तिलका मांझी भागलपूर विद्यापीठात चार सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची जाहिरात केली. कमल किशोर यांनी अर्ज केला. मे 2022 मध्ये निकाल आला आणि कमल किशोर यांना त्याच विभागात सहाय्यक प्राध्यापक बनवण्यात आले ज्या विभागात ते शिपाई म्हणून काम करत होते.

कमल किशोर अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आहेत. एका रिपोर्टनुसार, त्यांच्या वडिलांचे चहाचे दुकान आहे. कमल किशोर म्हणाले, ‘मी माझ्या अभ्यासात गरिबी आणि कौटुंबिक समस्या येऊ दिले नाहीत. सकाळी अभ्यास करायचो आणि दिवसा ड्युटी करायचो.” ते रात्रीही अभ्यास करायचे.

एका लेखानुसार, कमल किशोरच्या यशावर विद्यापीठाचे अधिकारी नाराज आहेत. या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी कुलगुरूंनी चार सदस्यीय पथक स्थापन केले आहे. विद्यापीठाची परवानगी घेऊनच पुढील शिक्षण घेतल्याचे कमल किशोर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page