अबब! तब्बल 11 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी, तिच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर सापडली..

दररोज सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातून आपल्याला जगभरातील विविध प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत असतात. यात काही मनोरंजनात्मक तर काही आश्चर्यकारक घटना असतात ज्या आपल्याला थक्क करतात. आज आपण अशीच एक धक्कादायक घटना पाहणार आहोत जी केरळ येथून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील पलक्कड येथील आयलूर या गावातील एक युवती 11 वर्षांपूर्वी तिच्या घरातून बे’प’त्ता झाली होती. या महिलेचे नाव सजीता असून ती त्यावेळी 18 वर्षांची होती. सजीता आणि त्यांच्या इथेच राहत असलेला रहमान या दोघांचे प्रे’म’सं’बं’ध होते.

पुढे त्यांच्या प्रे’म’सं’बं’धां’मधून फेब्रुवारी 2010 मध्ये सजीता आपले घर सोडून तिच्या प्रियकराच्या म्हणजेच रहमान याच्या घरी एका खोलीत लपून राहत होती. 11 वर्षांपूर्वी बे’प’त्ता झालेली ही युवती आपल्या शेजारीच राहत असलेल्या प्रियकराच्या घरात राहत होती. तरीही प्रेयसीच्या कुटूंबाला इतके वर्ष याबद्दल काहीही माहिती नव्हते.

त्यांनतर 11 वर्षांनी ही घटना उघडकीस आली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रहमानचे घर सजीताच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. रहमान आपल्या पालकांसमवेत राहत होता. यादरम्यानच्या काळात घरच्यांनी सजीताला शोधण्याचा खूप प्रयत्नही केला होता मात्र तेव्हा ती काही सापडली नाही.

सजीता तिचा प्रियकर रहमान याच्या खोलीत राहत होती. ती कुठेही बाहेर जायची नाही. तिचे कपडे देखील ती तिच्या खोलीतच धुत असत. तसेच जर कोणी त्याच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला तर रहमान त्यांच्यावर रागवायचा. “माझ्या खोलीत कोणीही जायचे नाही”, असे त्याने त्याच्या घरच्यांना आधीच सांगितले होते. तो त्याचे जेवण सुद्धा त्याच्याच खोलीत करत होता.

रहमान कधी कधी कामावर देखील जायचा नाही. त्याच्या खोलीत शौचालय आणि स्ना’न’गृह नसल्यामुळे सजीता रात्री घरातील सगळे झोपले की खोलीच्या खिडकीमधून बाहेर जायची आणि परत यायची. तिला खिडकीमधून आता बाहेर करता यावे यासाठी खिडकीची लोखंडी जाळी काढण्यात आली होती. हे सगळे बरेच वर्ष असेच चालू होते.

यादरम्यान एकदा रहमानच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न करण्याचे ठरवले. परंतु, त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला की तो नेहमीच टाळाटाळ करायचा. आता त्याला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला होता. म्हणून त्याने सगळ्यांना खरे सांगण्याचे ठरवले.

अखेर तब्बल 11 वर्षांनंतर रहमान आणि सजीता गेल्या वर्षी मार्च मध्ये बाहेर आले. रहमानने याबाबत पोलिसांना कळवले. त्यांनतर पोलिसांनी दोघांचे ही विचार लक्षात घेऊन दोघांना कोर्टात हजर केले आणि आता कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली. सजीता ही सध्या 30 वर्षांची असून रहमान 35 वर्षांचा आहे. यांच्या या अनोख्या प्रेमाची गोष्ट तुफान व्हायरल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page