जम्मू काश्मीर येथे झालेल्या दु’र्घटनेत तीन जवानांचा झाला दु’र्दै’वी अं’त, महाराष्ट्राच्या धुळे येथील विरपुत्राला आले वी’र’म’र’ण

जम्मू काश्मीर येथे हिमस्खलनात तीन जवानांचा दु’र्दै’वी अं’त झाला आहे. या तीन जवानांपैकी एक जवान हे महाराष्ट्रातील असल्याचे माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर मधील माछिल कुपवाडा येथे शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी काही जवान येथे गस्त घालत असताना अचानक मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. त्याचवेळेस अचानक बर्फाचा मोठा तुकडा जवानांच्या अंगावर पडला.

शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या दु’र्दै’वी घटनेत अचानक कोसळलेल्या बर्फाच्या मोठ्या तुकड्याखाली पाच जण चि’र’ड’ले गेले. स्थानिक प्रशासनाकडून मदत मिळेपर्यंत बर्फाच्या तुकड्याखाली चि’र’ड’ले गेलेल्या दोन लष्करी जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

तर यात तीन जवानांना आपले प्राण ग’म’वा’वे लागले आहे. माछिल कुपवाडा सेक्टरमध्ये अलमोरा पोस्ट या परिसरात हे तीन जवान गस्त घालत होते. अशी माहिती देण्यात आली आहे. याआधी 14 जानेवारी 2020 मध्ये या ठिकाणी अशीच मोठी दु’र्घ’ट’ना घडली होती ज्यात चार जवानांना वी’र’म’र’ण आले होते. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये या ठिकाणी झालेली ही दुसरी मोठी दु’र्घ’ट’ना आहे.

वीरगती प्राप्त झालेल्या तीन जवानांचे नाव, 22 वर्षीय गनर सौविक हाजरा, 22 वर्षीय लांस नायक मुकेश कुमार तसेच 41 वर्षीय नायक मनोज लक्ष्मण गायकवाड अशी आहेत. या तीन जवानांपैकी एक जवान म्हणजेच 41 वर्षीय नायक मनोज लक्ष्मण गायकवाड हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सुपुत्र आहेत.

मनोज गायकवाड हे 2002 साली भारतीय सैन्य दलात सामील झाले होते. लष्कराच्या 56 राष्ट्रीय रायफल बॅचचे मनोज गायकवाड हे जवान होते. गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच इतर दोन तरुण जवानांना वीरगती प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या ही कुटुंबावर शो’क’क’ळा पसरली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page