जगातील सर्वाधिक मोठे असलेले विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाले दाखल..

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरी उपयोगासाठीचे जगातील सर्वात मोठे विमान ‘एअरबस बेलुगा’ हे मंगळवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहे.

‘एअरबस बेलुगा’ या विमानाला Airbus A300-608ST असे म्हणतात. या विमानाला ‘बेलुगा’ असे म्हंटले जाते कारण या विमानाचा अकार बेलुगा व्हेल माश्यासारखा आहे. यादरम्यान, एअरबस कंपनीचे ‘ए300-600 एसटी’ हे ‘बेलुगा’ या नावाने ओळखले जाणारे विमान 51 टन मालवाहू क्षमता असलेले जगातील सर्वात मोठे विमान आहे.

जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या विमानाबरोबरच एक प्रवासी वाहतुकीमध्ये जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले विमान ‘एम्ब्रेअर ई 192-ई2’ प्रॉफिट हंटर देखील मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहे.

नागरी उपयोगातील ॲन्तोनोव्ह कंपनीचे ‘एएन 124’ व ‘एएन 225’, ही दोन विमाने सगळ्यात मोठी होती. या दोन्ही विमानांची सामान वाहून नेण्याची क्षमता ही 171 व 250 टन आहे. आतापर्यंत एवढे मोठे कुठलेही विमान अस्तित्वात नव्हते.

मुंबई विमातळावर जगभरातून अनेक पर्यटक, अनेक बिझनेसमन येत असतात. त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित असणारे सगळेच प्रवासी एवढे मोठे विमान बघून चकित झाले आहेत. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या विमानांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page