महिलेला रस्त्यात सापडले तब्बल 50 हजार रुपये, पुढे त्या महिलेने जे केले ते पाहून थक्क व्हाल..

आताचे हे युग म्हणजे क’लि’यु’ग आहे असे म्हणतात. या युगात लोक एकमेकांच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या देखील विरोधात जात आहेत मात्र, अजूनही आपल्याला प्रामाणिकपणा दिसून येतो. आज आपण अशीच एक घटना पाहणार आहोत.

सध्याच्या काळात लोक एक रुपयासाठी इतरांची फ’स’व’णू’क करताना पाहायला मिळत आहेत, अशा परिसथितीमध्ये या महिलेला 50 हजार रुपये आढळून आले परंतु, तरीही तिच्या मनाला त्याचा मोह झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रांची येथील कणके येथील रहिवासी असलेल्या रूपा देवी या सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आपल्या मुलीसह बाजारात जात होत्या. त्या अल्बर्ट एक्का चौकात आपल्या मुलीसोबत फास्ट फूड काऊंटरवर स्नॅक्स खात होत्या.

तेव्हा त्यांना रस्त्यावर 50 हजार रुपयांचा गठ्ठा पडलेला दिसला. त्यांनी ते पैसे उचलेले तेव्हा त्यांना हे नकली तर नाहीत ना असा विचार आला. परंतु, त्या पैशांच्या बंडलवर बँक ऑफ इंडियाचे नाव पाहिले. त्यांनतर त्यांनी ते पैसे घेऊन अल्बर्ट एक्का येथील शाखेत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

त्यांनतर तेथील स्थानिक दुकानदाराला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने सांगितले की, काही वेळेपूर्वीच शिवचंद्रसिंग यांनी बँकेतून काही पैसे काढले होते. कदाचित त्यांचे हे पैसे असावेत असे म्हणत त्यांनी शिवचंद्र सिंग यांना कळवले. त्यांनतर शिवचंद्रसिंग हे लगेच तिथे आले आणि त्यांनी सांगितले की त्यांनी बँक ऑफ इंडिया मधून काही वेळापूर्वीच 70 हजार रुपये काढले होते.

त्यांनी बँकेतून निघताना पन्नास हजार आणि वीस हजार असे दोन विभाजनी करून ते पैसे आपल्या खिशात ठेवले होते. त्यांनतर ते आपल्या मुलासह दुचाकीवरून घरी गेले. यानंतर काही वेळाने त्यांना दुकानदाराने फोन करून “तुझे पैसे हरवलेत का?” असे विचारले असता त्यांना आपले पैसे हरवल्याचे समजले.

ते त्वरित तेथे पोहचले. तेव्हा सगळ्यांसमोर रूपा देवी यांनी शिवचंद्रसिंग यांना पैसे दिले. पैसे मिळाल्यानंतर त्यांनी रूपा यांचे आभार मानले आणि त्यांच्या मुलीला मिठाई खाण्यासाठी एक हजार रुपये दिले.

तेव्हा सुरुवातीला पैसे घेण्यास रूपा यांच्या मुलीने नकार दिला. परंतु, रूपा यांनी हे पैसे आशीर्वाद म्हणून घे असे सांगितले. या घटनेची सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान चर्चा रंगली. अनेकांनी या महिलेचे भरभरून कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page