मुकेश अंबानी यांची बहीण आहे या मोठ्या कंपनीची मालकीण, नेहमी प्रसिध्दीच्या दुनियेपासून असते दूर..

देशातील शक्तिशाली उद्योजकांपैकी एक असलेले नाव म्हणजे मुकेश अंबानी. जेव्हा जेव्हा देशातील मोठ्या उद्योजकांचा विषय निघतो तेव्हा आपल्यासमोर रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा असलेले मुकेश अंबानी यांचे नाव सर्वप्रथम येते. त्यांनी मेहनतीने आणि कठोर परिश्रम करून रिलायन्स कंपनीला एका उंच शिखरावर नेले आहे.

अनेकांना मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटूंबियांची साधारणतः बरीच माहित आहे. परंतु, आज आपण मुकेश अंबानी यांच्या बहिणीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या गोष्टी कदाचित काहींना माहित देखील नसतील.

मुकेश अंबानी यांच्या बहिणीचे नाव नीना कोठारी आहे. त्या खूप कमी माध्यमांसमोर येत असतात. म्हणूनच त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. नीना कोठारी यांचा विवाह एच.सी. कोठारी समूहाचे अध्यक्ष असलेले भद्राश्याम कोठारी यांच्याबरोबर झाला होता. निना कोठारी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे नाव नयनतारा आणि मुलाचे नाव अर्जुन कोठारी असे आहे.

2015 मध्ये नीना कोठारी यांचे पती भद्राश्याम कोठारी यांचे गंभीर आजारमुळे नि’ध’न झाले. पतीच्या नि’ध’ना’नं’त’र नीना यांनी त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली. त्या आता कोठारी साखर कारखान्याच्या मालक असून, अनेक शक्तिशाली उद्योजिकांच्या यादीत त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले आहे.

निना कोठारी यांची मुलगी नयनतारा हीचा 2012 मध्ये विवाह झाला आहे, तसेच मुलगा अर्जुन याचाही 2019 मध्ये विवाह झाला आहे. अर्जुन कोठारी हे कोठारी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून साखर कारखाना, पेट्रोलियम व्यवसाय आणि केमिकल व्यवसाय संभाळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page