या धाडसी महिलेने अगदी सावित्रीप्रमाणे आपल्या पतीचे प्राण वाचवले, पतीला ट्रेनमध्ये प्रवास करत असताना..

आपण सर्वांनी सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची गोष्ट ऐकलीच असेल. ज्यात सावित्रीने आपल्या मृ’त पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश येथील मथुरा मध्ये राहणारे दाम्पत्य केशवन आणि दया हे दिल्लीहून कोझिकोडला कोइंबतूर एक्स्प्रेसने जात होते.

प्रवासादरम्यान अचानक केशवन यांची प्रकृती खालावली. त्यांना ट्रेन मधेच हृ’दय’वि’काराचा झ’टका आला. मथुरा स्थानकावर ट्रेन थांबतच दया यांनी ट्रेनमधील इतर प्रवाशांच्या मदतीने आपल्या पतीला बाहेर उतरवले. आरपीएफ जवानांना माहिती मिळताच त्यांनी लगेच त्यांच्याजवळ धाव घेतली. त्यांनी कंट्रोल रूमला सूचना देऊन तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यास सांगितले.

इकडे केशवन हे  यातना सहन करत होते. त्यांची ही अवस्था पाहून दया यांना रडू आवरत नव्हते. रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत त्यांनी केशवन यांना माउथ सीपीआर देण्यास सुरुवात केली आणि आरपीएफ जवानांना त्यांच्या छातीला सीपीआर दिला. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे त्यांना सीपीआर देण्यास आला.

दया यांनी आपल्या पतीला तोंडाने सीपीआर देवून त्यांनी आपल्या पतीचे प्राण वाचवले. अवघ्या 33 सेकंदातच मृ’ता’व’स्थे’त असलेले त्यांचे पती हालचाल करू लागले. यानंतर लगेचच रुग्णवाहका पोहचली आणि त्यांना त्वरित रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

जसे सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते तसेच दया यांनी आपल्या पतीमध्ये प्राण फुंकले आणि म’र’णा’च्या दारात असलेल्या आपल्या पतीला पुन्हा जिवंत केले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. दया यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page