वैद्यकीय विद्यार्थिनीने ग’र्भवती महिलेची चालत्या ट्रेनमध्येच केली प्र’सू’ती, आईने दिला एका गोंडस निरोगी बाळाला जन्म..

वैद्यकीय विद्यार्थिनी असलेल्या डॉ. के. स्वाती रेड्डी या विशाखापट्टणम येथील गीतम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये हाऊस स’र्जन आहेत. त्या दुरांतो ट्रेनने प्रवास करत असताना त्याच कोचमध्ये असलेली एक 28 वर्षीय ग’र्भ’व’ती महिला विषाखापट्टनमसाठी प्रवास करत होती. अचानक त्या ग’र्भ’व’ती महिलेला ट्रेनमध्येच प्र’सु’ती’क’ळा येण्यास सुरूवात झाली.

ही महिला तिच्या पतीसोबत शिकाकुलमपासून विशाखापट्टनमपर्यंतचा प्रवास करत होती. स्वाती यांना त्या महिलेच्या तीव्र त्रासाची जाणीव होताच त्यांनी तिची मदत करण्याचे ठरवले. स्वाती या वैद्यकीय विद्यार्थिनी असल्या तरीही प्र’सु’ती करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या. परंतु मोठ्या धैर्याने स्वाती यांना त्या महिलेची ट्रेनमध्येच प्र’सु’ती करण्यात यश आले.

महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून महिलेची योग्य वेळी प्र’सु’ती होऊन तिचा जीव देखील वाचला आहे. विशेष म्हणजे या महिलेची प्र’सु’ती ट्रेनमध्ये झाली असली तरीही आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत.

वैद्यकिय विद्यार्थिनी असलेल्या स्वाती यांच्या अथक प्रयत्नांबद्दल महिलेच्या कुटुंबियांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे. अनकापल्ली स्थानकावर गाडी थांबल्यानंतर कुटुंबीयांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

स्वाती यांच्या या मौल्यवान आणि धाडसी कार्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. त्यांनी परिस्थिती हाताळत जो निर्णय घेतला आणि जे धाडस दाखवले ते खरोखरच वाखाण्याजोगे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page