कराडामध्ये घडली दुर्दै’वी घटना, भुयारी गटर साफ करताना एका कर्मचाऱ्याचा झाला गु’दमरून मृ’त्यू..

कराड शहराच्या वाखाण परिसरातून एक मोठी दु’र्घटना समोर आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड नगरपालिकेचे कर्मचारी अनिरूध्द लाड व अमोल चंदनशिवे हे वाखाण परिसरातील भुयारी गटराची स्वच्छता करत होते.

गटारांची स्वच्छता करीत असताना अनिरूध्द लाड या कर्मचाऱ्याचा श्वास गु’द’म’र’ला आणि ते तिथेच बे’शु’द्ध पडले. ते बे’शु’द्ध झालेत हे समजताच त्यांच्या मदतीला दुसरे क्रमचारी अमोल चंदनशिवे गेले. त्यांना मदत करत असताना हे देखील गंभीर जखमी झालेले आहेत. ही सर्व बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी अनिरूध्द लाड आणि अमोल चंदनशिवे यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात नेले.

त्यांनतर पुढील उपचारांसाठी त्यांना कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. पण अनिरुद्ध लाड या कर्मचाऱ्याचे उपचारादरम्यान नि’ध’न झाले. तर अमोल चंदनशिवे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page