11 वर्षापूर्वी बेपत्ता झालेली मुलगी, तिच्या आई-वडिलांच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर राहत होती..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांपूर्वी केरळच्या पलक्कड मधील आयलूर गावात एक युवती बेपत्ता झाली होती. या महिलेचे नाव सजीता असून जेव्हा ती बेपत्ता झाली तेव्हा ती 18 वर्षांची होती. फेब्रुवारी 2010 मध्ये सजीता आपले घर सोडून तिच्या प्रियकराच्या म्हणजेच रहमान याच्या घरात एका खोलीत लपून राहत होती.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती आपल्या आईवडिलांच्या घरापासून अवघ्या 500 मी अंतरावर राहत असलेल्या आपल्या प्रियकराच्या घरात राहत होती. मुलीच्या घरच्यांनी सजीताला शोधण्याचा प्रयत्नही केला होता मात्र तेव्हा ती काही सापडली नव्हती. सजीता रहमान याच्या खोलीतच राहायची.

ती बाहेर सुध्दा जायची नाही. तिचे कपडे ती तिथेच धुत असे. जर कोणी खोलीत जाण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा रहमान त्यांच्यावर रागवयचा. माझ्या खोलीत जायचे नाही असे त्यांनी घरतल्यांना दटावून सांगितले होते. तो आपले जेवण आपल्या खोलीतच करत होता. तो काहीवेळेस कामावर देखील जायचा नाही.

रहमानच्या खोलीत शौ’चालय आणि स्ना’नगृह नव्हते त्यामुळे सजीता रात्री घरातील सगळे झोपले की ती खोलीच्या खिडकीमधून बाहेर जायची. हे सर्व तब्बल 11 वर्ष चालू होते. मागील वर्षी रहमानच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न करायचे ठरवले. परंतु तो नेहमी टाळाटाळ करत राहिला. त्याला या सगळ्याचा कंटाळा आला होता.

म्हणून तो गेल्या वर्षी मार्च मध्ये बाहेर पडला. त्याने याबाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांची विचारपूस करून दोघांनाही को’र्टात हजर केले. अखेर कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली. सजीता सध्या 30 वर्षांची तर रहमान 35 वर्षांचा आहे. यांच्या या अनोख्या प्रे’माची गोष्ट सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान व्हायरल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page