1 वर्षाची मुलगी आपल्या श’हीद वडीलांच्या पुतळ्याला घट्ट मिठी मारून त्यांच्याशी बोलू लागली..

छत्तीसगड मधील कोरबा जिल्ह्यातील श’ही’द एसआय मूलचंद कंवर हे दोन वर्षांपूर्वी लढताना श’ही’द झाले. मुलचंद कंवर हे 12 ऑगस्ट 2013 रोजी पोलिस विभागात उपनिरीक्षक झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नारायणपूर जिल्ह्यात आपले कार्य बजावत होते.

नारायणपूर येथे कार्य बजावत असताना त्यांना वेळोवेळी न’क्ष’ल’वा’द्यां’चा सामना करावा लागत होता. काही काळानंतर त्यांची बढती होणार होती. मात्र, त्यापूर्वीच अबुझमाड येथे न’क्ष’ल’वा’द्यां’शी दोन हात करताना 24 जानेवारी 2018 रोजी ते श’ही’द झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

मूलचंद यांचे एप्रिल 2017 मध्ये इंद्रप्रभा यांच्याशी विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी इंद्रप्रभा या प्राध्यापक आहेत. मूलचंद श’ही’द झाले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. लग्नाच्या एका वर्षातच आपले पती श’ही’द झाल्यामुळे इंद्रप्रभा या पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. इंद्रप्रभा त्यावेळेस ग’रो’द’र होत्या. मूलचंद श’ही’द झाल्याच्या आठ महिन्यांनंतर 3 सप्टेंबर 2018 रोजी त्यांच्या मुलीचा जन्म झाला. तिचे नाव वानिया आहे.

मूलचंद श’ही’द झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचे स्मारक बांधले आहे. त्यांची मुलगी ही केवळ एक वर्षाची होती तेव्हा ती तिच्या वडिलांच्या पुतळ्याला चिकटून उभी राहिली होती आणि आपल्या वडिलांना मिठी मारून त्यांच्यासोबत बोलत होती.

कुटुंबियांनी सांगितले की, जेव्हा वानियाने नातेवाईकांना ओळखण्यास सुरुवात केली होती, तेव्हा तिला तिच्या वडिलांचे फोटो दाखवले होते. तेव्हा तिने लगेच आपल्या वडिलांच्या पुतळ्याला ओळखले आणि मिठी मारून त्यांच्या बोली भाषेत बोलू लागली.

एवढी लहान मुलगी आपल्या वडिलांच्या पुतळ्याशी बोलताना पाहून तेथील उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. तिचा हा फोटो सो’श’ल मी’डि’या’व’र देखील पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page