15 वर्षीय नम्रताने आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरीत बु’डणाऱ्या चिमुकल्याचे प्राण वाचवले..

कोल्हापूरमधील दानोळी येथील जयसिंगपूर-दानोळी रस्त्यावरील कटारे मळा येथे कटारे कुटुंब राहतात. दुपारच्या वेळेस घरातील सगळे कामात व्यस्त होते. तसेच भारत-पाकिस्तानची अटीतटीची मॅच बघण्यासाठी सगळ्याच देशाचे लक्ष वेधले होते. अशीच परिस्थिती कटारे यांच्याही कुटुंबात होती. सगळेच जण मॅच बघण्यात गुंग झाले होते.

अशा वेळेस दिवाळीच्या सुट्टया असल्याने या कुटुंबातील 3 वर्षीय शौर्य कटारे आणि त्याचा 5 वर्षीय भाऊ ओजस कटारे हे दोघेही अंगणात एकमेकांसोबत खेळत होते. नुकतेच अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जागोजागी विहिरी तुडुंब भरलेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये शौर्य आणि ओजस हे त्यांच्या घराबाहेरील अंगणात असलेल्या विहिरीजवळ खेळत होते.

दोघे भावंडं खेळताखेळता अचानक 3 वर्षीय शौर्य काठोकाठ भरलेल्या विहिरीमध्ये पडला. यावेळी पाच वर्षांचा असलेला ओजस याला तेथे कोणीही मोठे लोक दिसले नाहीत म्हणून तो जोरजोरात ओरडू लागला.

ओजस का ओरडत आहे हे पाहण्यासाठी या मुलांची आत्या 15 वर्षीय नम्रता कलगोंडा कटारे ही इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. तिने आपल्या भाच्याला विहिरीत बुडताना पाहिले आणि तिने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उ’डी मारली आणि 3 वर्षीय शौर्यला पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. तेथे उपस्थित कोणालाही जे सुचले नाही ते नम्रताने आपल्या जीवाची पर्वा न करता करून दाखवले. नम्रता ही नुकतीच पोहायला शिकली आहे, असे नम्रताने सांगितले.

भल्या भल्यांना जे सुचले नाही ते या नववीत शिकणाऱ्या मुलीने करून दाखवले यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच तिच्या शाळेत ही माहिती मिळताच दानोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी तिचे कौतुक करत तिचा स्तकार केला आहे. तिच्या या धाडसाचे गावातील नागरिकांनी देखील खूप कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page