महिला कर्मचाऱ्याच्या शरीरयष्टीवरून कमेंट करणे बॉसला पडले चांगलेच महागात, कोर्टाने ठोठावला एवढा मोठा दं’ड

एखाद्या व्यक्तीला त्याच्या रंगावरून किंवा त्याच्या देहयष्टीवरुन त्या व्यक्तीला सतत हिणवने हा कायद्याने गु’न्हा आहे. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. ज्यामध्ये बॉसला महिला कर्मचाऱ्यावर कमेंट करणे महागात पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय महिला आयशा जमानी ह्या एका टेक्सटाइल कंपनीमध्ये नोकरी करत होत्या. मात्र, त्या कंपनीमधील 45 वर्षीय बॉस शहजाद युनूस हा आयशा जमानी यांना सतत त्यांच्या देहयष्टीवरुन कमेंट करत असत.

जाड असल्याबबात त्यांना सारखा हिणवत असत. तसेच विचित्र नावांनी देखील त्यांना हाक मारत असे. एवढेच नव्हे तर बॉस शहजाद युनूस ह्याने आयशा यांना अनेकवेळा आक्षेपार्ह मेसेजेस देखील पाठवले होते.

‘मला माझा ऑफिस मध्ये जाड मुली नको आहेत. तू जाड आहेस, तू सुंदर नाहीस. मला सुंदर आणि स्लिम मुली माझा ऑफिस मध्ये हव्या आहेत.’ असे बोलून बॉस शहजाद युनूस हा सारखा आयशा यांना हिणवत असे. तसेच त्यांना नेहमी जिम जॉईन करण्याबाबत सल्ला देत असत.

हे प्रकरण जवळपास दोन वर्ष सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे आणि यामुळे आयशा यांना त्रास होत होता. कंपनीमधील बॉस शहजाद युनूस हा अनेक कर्मचाऱ्यांना ध’म’की देत असत, तसेच त्यांना गु’ला’मा’सारखे वागवत असा ही आ’रो’प आयशा जमानी यांनी केला आहे.

बॉसच्या सततच्या या अ’प’मा’ना’स्प’द वागणुकीमुळे आयशा जमानी यांच्या मानसिकतेवर परिणाम होत होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी बॉस शहजाद युनूस याच्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली आणि बॉस विरूध्द याचिका दाखल केली.

नुकतेच कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी केली असून बॉस शहजाद युनूस याच्या अ’प’मा’न’कारक आणि आक्षेपार्ह वागणुकीमुळे बॉसला न्यायाधीशांनी चांगली समज देऊन कोर्टाने शहजाद याला 18 लाख रुपये दं’ड भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या गोष्टीची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. बॉसने कर्मचाऱ्यांना दिलेल्या या वागणुकीबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page