जळगावच्या सुपुत्राला जम्मू – काश्मीरमध्ये वी’र’म’र’ण, संपूर्ण गावावर पसरली शो’क’क’ळा, ही भेट ठरली शेवटची..

आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सैनिक आपल्या भारतमातेचे रक्षण करत असतात. म्हणतात ना, हा तिरंगा वाऱ्यावर नाही तर सैनिकांच्या श्वासावर फडकत असतो. परंतु, जर एखादा सैनिक जर श’ही’द झाला तर संपूर्ण देश त्या कुटुंबाच्या दुःखात सामील होतो. जळगावचे सुपुत्र नायब सुभेदार विपीन खर्चे यांना सोमवारी वी’र’म’र’ण आले.

विपीन जम्मू- काश्मीरमधील उधमपूर येथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांची दुचाकी दरीत कोसळली आणि त्यांचा त्यात दु’र्दै’वी मृ’त्यू झाला. सोमवारी रात्री उशीरा त्यांचे पा’र्थि’व त्यांच्या मुळगावी निमखेडी येथे नेण्यात आले आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अं’ति’म सं’स्का’र करण्यात आले.

श’ही’द सैनिक विपीन खर्चे हे भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण गावात शो’क’क’ळा पसरली आहे. 2000 साली सैन्यात भरती झालेल्या विपीन यांनी देशातील विविध भागात आपली सेवा बजावली.

मागील वर्षी ते आग्रा येथे आपली सेवा देत असताना त्यांना नायब सुभेदार म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांचा कार्यकाळ संपत आला होता, परंतु देशसेवेसाठी त्यांनी आपला कार्यकाळ वाढवून घेतला.

विपीन खर्चे यांचा आई इंदूबाई, पत्नी रुपाली आज दोन मुले असा परिवार होता. त्यांच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत. त्यांच्या पत्नी रुपाली यांचा भाऊ आजारी असल्याने विपीन महिनाभरापूर्वीच सुट्टी घेऊन गावी गेले होते. मात्र त्यांची ही भेट शेवटची भेट ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page