ज्या ब्लॉकमध्ये पती सफाई कामगार म्हणून काम करत आहे, त्याच ब्लॉकची निवडणूक जिंकून पत्नी झाली प्रमुख!

आपला देश हा पुरुष प्रधान देश असूनही आपल्या देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात अव्वल असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आज आपण अशा एका महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यात महिलेचा पती ज्या ब्लॉकमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता त्याच ब्लॉकमध्ये ती आता प्रमुख बनली आहे.

ही घटना उत्तर प्रदेश मधील असून या महिलेचे नाव सोनिया असे आहे. सोनियाचा पती सुनील हा बलियाखेडी ब्लॉकमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात. त्याच ब्लॉकमध्ये सोनियाने निवडणूक जिंकून प्रमुखपदाला गवसणी घातली आहे. सुनीलने कल्पना देखील केली नव्हती की, त्याची पत्नी तो जिथे काम करतो त्याच ब्लॉकमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार हा आपल्या कुटुंबासह नानहेडा गुर्जर या गावात राहतो. सुरुवातीला सोनिया गृहिणी म्हणून घराची काळजी घेत होती. त्यांनतर, त्रिस्तरीय पंचायत निवडणुक होणार होती.

त्यामध्ये बीडीसी पदासाठी आरक्षण असल्याने अ’नु’सू’चित जा’ती प्रवर्गातील लोकांना जागा मिळणार होती. यासाठी गावकऱ्यांनी सुनीलला सोनियाला बीडीसी पदाच्या निवडणुकीला उभे राहण्यास सांगितले. यावर सोनियाने देखील होकार दिला.

या निवडणुकीत सोनियाने विजय मिळवला आणि तिची ब्लॉक प्रमुख म्हणून बिनविरोध निवड झाली. सोनिया आपल्या या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबीयांना तसेच तिच्या पतीला देते. तिने सांगितले की, माझे प्रमुख ध्येय म्हणजे गावाचा विकास करणे आहे. त्या दृष्टीने ती तिच्या गावाच्या विकासासाठी आवश्यक ते काम करेल असे तिने सांगितले आहे.

ज्या ब्लॉकमध्ये सोनियाने निवडणूक जिंकून प्रमुखपद मिळवले आहे तेथे सुनील सफाई कामगार म्हणून आधीपासूनच काम करत होता. “आता सोनिया ब्लॉक प्रमुख झाली असली तरीही मी माझे काम करत राहील. सोनियाचा कार्यकाळ हा केवळ 5 वर्षांचा आहे परंतु, माझी ही नोकरी 60 वर्षांसाठी आहे. त्यामुळे मी माझी नोकरी सोडणार नाही”, असे सुनीलने सांगितले आहे. या पती-पत्नीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page