पत्नीला पोलिस होता यावे यासाठी पतीने घर आणि जमीन विकली, पोलिस होताच पत्नीने पतीला सोडले आणि..

प्रेमात पडलेल्या व्यक्तीला भान नसते असे म्हणतात. प्रेमात काय चूक काय बरोबर हे त्याला कळत नाही आणि जेव्हा तो भानावर येतो तेव्हा त्याला त्याची चूक कळते मात्र, तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. नुकताच असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिथून कुमार हे पोलीस भरतीसाठी तयारी करत होते. यादरम्यान मिथून पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात पडले. यानंतर तरुणीला देखील मिथून आवडू लागले होते. ते दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले आणि काही दिवसांनी ते विवाह बंधनात अडकले.

मिथुन यांचे त्यांच्या बायकोवर अफाट प्रेम होते. आपल्या बायकोला पोलीस होता यावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी स्वतः चे घर आणि जमीन सुद्धा या साठी विकली. अनेक प्रयत्नानंतर त्यांची बायको पोलिस झाली.

परंतु पुढे असे काही घडले की, ते वाचून तुम्हाला धक्का बसेल. मिथुन कुमार यांच्या बायकोने पोलिस होताच आपल्या पतीला म्हणजेच मिथुन कुमार यांना सोडले आणि ती तिच्या दुसऱ्या प्रियाकरासोबत निघून गेली.

या प्रकरणामुळे मिथुन यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. त्यांनी या घटनेनंतर पोलीस ठाण्यात आपल्या पत्नी विरोधात त’क्रा’र नोंदवली आहे. मिथुन यांच्या पत्नी विरूध्द आर्थिक फ’स’व’णू’की’चा दावा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page