सूर्यवंशम या चित्रपटाशी मिळतीजुळती आहे यांची गोष्ट, लग्नाच्या 14 वर्षांनी बनल्या डेप्युटी कलेक्टर..

अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट अनेकदा पाहिला असेल. पण तुम्हाला माहित आहे का की साहिबगंज येथील रहिवासी असलेल्या सविता सिंगची यांची गोष्ट या चित्रपटाशी मिळती जुळती आहे. सविता सिंह या साहिबगंजच्या उपजिल्हाधिकारी आहेत. आपल्या समर्पण आणि मेहनतीने त्यांनी जगासमोर आदर्श ठेवला आहे.

सविता यांचे 2006 मध्ये लग्न झाले होते आणि तेव्हापासून त्या गृहिणी म्हणून घरातील कामे सांभाळत होत्या. लग्नाच्या 2 वर्षानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. पण सगळ्यांच्या कामानंतर त्यांनी स्वतःच काही करायला वेळ मिळत नव्हता.

लग्नामुळे त्यांचा अभ्यासही मध्येच राहिला होता. घराच्या चार भिंतीतून आपण बाहेर पडू शकणार नाही असे सविता यांना वाटत होते. मात्र त्यांचे पती विभूती सिंग यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. यानंतर सविता यांनी इंग्रजीमध्ये एमए केले.

त्यांच्या लग्नाच्या 13 वर्षानंतर, त्यांनी JPSC परीक्षा दिली. 2020 मध्ये त्यांचा निकाल आला आणि त्या डेप्युटी कलेक्टर झाल्या. खुंटी येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर, उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग 2022 मध्ये साहिबगंज येथे झाली.

उपजिल्हाधिकारी सविता सिंह यांचे वयाच्या 21 व्या वर्षी लग्न झाले होते. त्यावेळी सविता पदवीच्या शेवटच्या वर्षाला होत्या. लग्नानंतर आपली स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाहीत असं त्यांना वाटू लागलं. मात्र त्यांनी घरातील लोकांशी याबाबत बोलणे केले आणि त्यांच्यां पतीने त्यांना प्रोत्साहन दिले.

इंग्रजीमध्ये एमए केल्यानंतर सविता यांनी 2 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली, मात्र त्यांना यश मिळाले नाही. बीपीएससी प्रिलिमीनरी परीक्षा 3 वेळा यशस्वीपणे पास केली पण मुख्य परीक्षा पास करू शकल्या नाहीत. यानंतर त्यांनी आपली तयारी अधिक अचूक आणि योग्य दिशेने केली आणि जेपीएससीची परीक्षा दिली.

तिथे त्यांची निवड झाली. सविता यांचे लहानपणापासूनच स्वप्न होते की त्यांनी कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, देशाची सेवा करावी आणि आता त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सविता सांगतात की, “आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. त्याचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page