प्रवास करत असलेल्या फ्लाइटचा पायलट हा 30 वर्षांपूर्वी शिकवलेला विद्यार्थी आहे हे समजल्यावर शिक्षिकेला अश्रू अनावर झाले..

आपल्या ओळखीच्या लोकांशी आपली कधी कुठे भेट होईल याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या विमान प्रवासात सुधा सत्यन या पायलट कॅप्टन रोहन भसीन यांच्या शिक्षिका होत्या. त्या एअर इंडियाच्या विमानामधून प्रवास करत होते. त्या विमानाचे पायलट कॅप्टन रोहन भसीन होते.

रोहनच्या कुटुंबात बरेच जण पायलट आहेत. रोहनचे आजोबा जय देव भसीन हे भारतातील पहिले कमांडर आहेत. रोहनचे आईवडिल तसेच बहीण असे सगळेच कुटुंबीय एअरलाईन्समध्ये मध्ये आहेत. त्यामुळे त्याला लहापणापासूनच पायलट होण्याचे स्वप्न होते.

12 चे शिक्षण घेत असताना त्याने पायलटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती आणि आज तो एक उत्तम पायलट आहे. विमान प्रवास सुरू होताना सूचना देताना सुरुवातीला सगळया क्रू मेंबर्सची नावे घेतली जातात. त्यामध्ये रोहन भसीन यांचे नाव ऐकून सुधा सत्यन यांना आपल्या शेळेतील 30 वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्याची आठवण झाली.

शाळेत असताना जेव्हा रोहन प्लेस्कूलमध्ये पहिल्यांदा गेला होता तेव्हा त्याने स्वतःची ‘कॅप्टन रोहन भसीन’ अशी ओळख आपल्या शिक्षकांना करून दिली होती आणि आता योगायोगाने तब्बल 30 वर्षांनंतर तोच विद्यार्थी सुधा यांना भेटण्याचा योग आला होता.

रोहनचे नाव ऐकून सुधा यांनी एअर होस्टेसला सांगून रोहनला भेटण्याची विनंती केली. यानंतर एअरहोस्टेसने रोहनला सुधा यांच्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी सुधा यांना कॉकपिटमध्ये बोलावून घेतले. जेव्हा सुधा यांनी तब्बल 30 वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्याला पायलटच्या पोशाखात पाहून त्यांना आपले अश्रु अनावर झाले आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता पायलट रोहन यांना मिठी मारली.

हे दृश्य रोहन यांच्या आईने मोबाईल मध्ये कै’द करून हा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. कोणत्याही शिक्षकासाठी यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता असू शकतो. हा भावूक करणारा फोटो सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलाच धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. तसेच पायलट रोहन भसीन यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page