सासूने सुनेला भेटवस्तू म्हणून दिली चक्क 11 लाखांची कार, सासू म्हणाली, “ती आमची सून नसून मुलगी आहे”

सासू सूनेच्या अनेक‌ आश्चर्यकारक घटना समोर आलेल्या आपण पहिल्या आहेत. आज देखील आपण अशीच सासू-सुनांची आश्चर्य वाटेल अशी गोष्ट पाहणार आहोत. राजस्थानमधील खांडवा गावात राहणारे रामकिशन यादव गेले कित्येक वर्ष सीआरपीएफ मध्ये तैनात आहेत. एकेदिवशी रामकिशन यांचा मुलगा रणवीर याचे लग्न अलवर जिल्ह्यामधील खुवाना गावाची रहिवासी असलेल्या ईशा सोबत ठरले.

रामकिशन यादव आणि त्यांचे कुटुंबीय पुढारलेल्या विचारांचे आहेत. त्यामुळे लग्न ठरवायला गेल्यानंतर त्यांनी हुं’डा पद्धतीस पूर्णपणे नकार दिला होता. लग्न ठरल्यानंतर त्यांनी ईशाला शगुन म्हणून एक रूपये आणि नारळ दिला होता.

पुढे दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले. यानंतर ईशा लग्न होऊन सासरी आल्यानंतर तिच्या सासू कृष्णा यांनी सूनमुख बघून सूनेला भेटवस्तू म्हणून चक्क 11 लाखांची कार भेट म्हणून दिली. हे पाहून सगळ्यांनाच नवल वाटले.

कृष्णा यादव म्हणतात, “आम्ही आमच्या सूनेला सून न मानता मुलगीच मानली आहे.” त्यांनी सुनेला दिलेल्या या अनोख्या भेटवस्तुची सध्या सो’श’ल मी’डि’या’वर देखील चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page