या आईला आमचा सलाम! कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी 45 पुरुषांमध्ये एकमेव महिला कुली म्हणून करतात काम..

यश प्राप्त करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. हे आपल्याला माहीत आहे. पण तरीही आपण हार मनात नाही, आपला संघर्ष चालूच ठेवतो. अशा अनेक प्रेरक कथा आपण एकतो. कितीही संकटे किंवा अडचणी येऊ द्या, आपण त्यावर मात करणारच असा विश्वास काही प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांकडून आपल्याला मिळत असतो.

आज आपण अशाच एका प्रेरणादायी महिलेविषयी जाणून घेणार आहोत. जबलपूर मधील कुंडल येथील राहणाऱ्या संध्या मारावी यांचे 2015 पर्यंतचे आयुष्य खूप सरळ होते. मात्र, अचानक 2016 मध्ये संध्या यांचे पती भोलाराम यांचे हृ’दय’वि’का’रा’च्या झटक्याने नि’ध’न झाले.

अचानक पतीने साथ सोडल्यानंतर संध्या पूर्णपणे खचून गेल्या होता. आता पुढील आयुष्य कसे जगायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. वयस्कर सासुबाई आणि संध्या यांची 3 लहान मुलं यांची आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली होती.

त्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना कुठेही नोकरी मिळत नव्हती. त्या नोकरीच्या शोधत असताना त्यांना माहिती मिळाली की मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्टेशनवर पोर्टरची गरज आहे. त्यांना नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या नोकरीसाठी अर्ज केला.

जानेवारी 2017 पासून त्या मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्टेशनवर दररोज कुली म्हणून काम करतात. लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्या हे काम करत आहेत. त्या एकूण 45 पुरुषांमध्ये एकट्या स्त्री आहेत. त्या दररोज ये-जा करण्यासाठी 90 किमी चा प्रवास करत असतात. त्यांच्या सासुबाईंनी देखील त्यांना चांगली साथ दिली आहे. त्या घरातून बाहेर पडल्या की घरची आणि मुलाची सगळी जबाबदारी त्या अचूक पार पाडतात.

त्यांना त्यांच्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन देशसेेवेसाठी सैन्यात अधिकारी बनवायचे आहे आणि यासाठी कोणाकडेही हात पसरणार नाहीत. मेहनत करून उदनिर्वाह करणे यावर त्यांचा विश्वास आहे, असे संध्या म्हणतात.

त्यांचे हे काम पाहून लोक आश्चर्यचकित होतात. त्यांच्या या कामाचे कौतुक देखील करतात. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील त्यांच्या या कार्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अनेकांसाठी संध्या प्रेरणा बनल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page