सख्ख्या 3 बहिणींनी एकत्र पास केली इन्स्पेक्टरची भरती परीक्षा, वडील शेतकरी आणि आई गृहिणी..

आपली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द जर आपल्यात असेल तर यश हे हमखास मिळतेच. आज आपण अशाच सख्या तीन बहिणींची गोष्ट पाहणार आहोत. बिहार मधील सलुना गावातील तीन सख्ख्या बहिणी म्हणजेच मोठी फुलेना, छोटी मुन्नी कुमारी आणि ज्योती कुमारी या एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या मुली आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे.

या तीनही बहिणींचे प्राथमिक शिक्षण मिडल स्कूल सलोना येथे पूर्ण झाले आहे. पुढे त्या शकरपुरा येथून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. नंतर एमबीडीआय कॉलेज रामपूर बखरी येथून त्यांनी इंटर आणि यूआर कॉलेज रोसरा येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. या तिन्ही बहिणींनी इन्स्पेक्टरची प्राथमिक परीक्षा एकत्र दिली आणि तिघीही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या.

तीनही बहिणी सध्या बिहार पोलीस सेवेत कार्यरत आहेत. ज्योती आणि मुन्नी या दोघी जयनगरमध्ये तैनात आहेत आणि फुलेना ह्या पोलीस सेवेतच सार्जंट मेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रवास तितका सोपा नव्हता.

मात्र, तीनही बहिणींनी मेहनत करून आपल्या जिद्दीच्या जोरावर परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे त्यांच्या गावकऱ्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. सो’श’ल मी’डि’या’वर देखील या तीनही बहिणींचे भरभरून कौतुक केले जात आहे. अनेकांसाठी या तीनही बहिणी प्रेरणा बनल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page