“आई मी सुट्टीवर येणार आहे,” घरी जायच्या आधीच सांगलीतील जवानाचे पश्चिम बंगाल येथे नि’धन

काही दिवसांपूर्वीच साताऱ्याचे वीरसुपुत्र प्रथमेश पवार यांना सीमेवर लढताना वी’र’म’रण आले होते. त्यांच्या जाण्याच्या दुःखातून सावरत आहोत तोपर्यंत सांगली येथील जवान रवींद्र नरळे यांचे पश्चिम बंगाल मध्ये नि’ध’न झाले आहे. रवींद्र नरळे हे नाईक पदावर कार्यरत होते.

रवींद्र नरळे हे कुपवाड तालुक्यातील गोंधळेवाडी येथील रहिवासी असून ते न्यू विजयनगर येथे राहत होते. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शांतिनिकेतन या शाळेतून केले. पुढे तयारी करून ते 2005 साली भारतीय सैन्यात भरती झाले.

भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी जवळपास 17 वर्षे भारतातील विविध राज्यात देशसेवा केली. सध्या ते पश्चिम बंगाल येथील पानागड येथे आपली सेवा बजावत होते, परंतु त्यांचे आकस्मिक नि’ध’न झाले आहे. रविवारी कुटुंबातील लोकांना याबाबत माहीती देण्यात आली.

त्यांचे नि’ध’न होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यांनी आपल्या आईशी फोनवर बोलणे केले होते. त्यांनी त्यांच्या आईला, “मी लवकरच आता घरी येणार आहे, तू माझी काळजी करू नकोस, मी सांगलीला यायला गाडीला बसलो की तुला फोन करेन,” असे त्यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page