“बाहेरील पिज्जा खाण्यापेक्षा घरातील भाकरी आणि वरण-भात खा,” आशा भोसले यांचा महिलांना सल्ला

आशा भोसले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी दिली आहेत. असा कोणीही नसेल ज्यांना यांची गाणी आवडत नसतील. त्यांनी त्यांच्या गाण्याने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आजही त्या त्यांच्या गाण्याचा रोज रियाज करतात. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी महिलांना काही फिटनेस टीप देखील दिल्या.

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने त्या सांगत होत्या. यावेळी त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा करून देताना सांगितले की, “लहानपणी मी खूप जाड नव्हते. तेव्हा दीदी मला कडेवर घेऊन फिरायच्या. परंतु कालांतराने मी जाड होत गेले आणि अनेक वर्षे तशीच होते. मी वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केला.”

“पण आता मी माझ्या तब्येतीची काळजी घेत आहे आणि वयाच्या 60 वर्षापासून मी माझे वजन संतुलित केले आहे.” त्या जेव्हा अमेरिकेत राहायला होत्या तेव्हा त्यांना तेथील जाड महिलांची व्यथा कळाली होती. त्या महिलांची मुले देखील लठ्ठ झाली होती.

हे सर्व बघून त्यांनी त्यांच्या सुनेला देखील सांगितले की, नातवाला देखील पॅकेट मधील पदार्थ खायला देऊ नको. त्याला घरच्या जेवणाची सवय लावा आणि त्याला घरातील वरण भात दे. धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आहोत, त्यामुळे आपण देखील स्वतःसाठी थोडा का होईना पण वेळ काढायला हवा असे त्यांनी सांगितले.

लहान मुले ही मोठ्यांच अनुकरण करतात. आपण जे खातो तेच ती लहान मुले खात असतात. जर आपण पिज्जा खाल्ला तर ती लहान मुले देखील तसलेच काहीतरी खाणार. याऐवजी तुम्ही भाकरी खा. तुमचे जेवण जितके चांगले असेल तितके सुंदर तुम्ही दिसता असे त्यांनी सांगितले.

Dinesh Hiwarkar

Journalist @MumbaiPune | 5+ years of experience

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page