या आहेत भारतातील पहिल्या महिला ऑटो ड्रायव्हर, वयाच्या 18 व्या वर्षी घर सोडले आणि मेहनत करून स्वतःची कंपनी उभी केली

आपल्या देशाने आज एवढी प्रगती केली आहे की स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. उलट आज महिला या पुरुषांपेक्षा वरचढ काम करत आहेत. आजच्या काळात मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव केला जात नाही. आज स्त्री असो किंवा पुरुष दोघांमध्ये काही फरक नाही. दोघे ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ऑटो रिक्षाचा वापर करतो. आपण नेहमी एक माणूसच ऑटो चालवताना पाहिलेले आहे. आतापर्यंत आपल्या समाजात ही प्रथा चालू होती की फक्त पुरुषच ऑटो चालवतात. परंतु आपल्यापैकी कोणीही ऑटो चालवणे आता शक्य झाले आहे.

सरकारने रिक्षा चालवणाऱ्यां कोणावरही निर्बंध लादलेले नाहीत. पण आपल्या समाजाला नेहमीच काही मर्यादा असतात. काही लोक या मर्यादांना विरोध करतात आणि पुढे जाऊन समाजाला एक नवा आदर्श घालून देत असतात. काही लोक या मर्यादेच्या चौकटीत राहून त्यांची स्वप्ने मा’रू’न टाकतात.

आज आपण अशाच एका स्त्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी समाजाच्या मर्यादांना विरोध करून पुढे जाण्याचा विचार केला, जी प्रत्येकासाठी एक प्रेरणा बनली आहे पण त्याचबरोबरीने त्यांनी एक नवीन सुरुवात देखील केलेली आहे. आज आपण ज्या महिलेबद्दल जाणून घेणार आहोत त्या भारतातील पहिली महिला ऑटो चालक आहेत.

त्यांचं नाव शीला डावरे असून त्या मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. शीला यांना लहानपणापासूनच ड्रायव्हिंगची खूप आवड होती आणि त्यांना मोठे होऊन त्याच क्षेत्रात आपले करिअर करायचे होते.

आपल्या समाजातील काही लोकांची मानसिकता अशी आहे की मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य अजूनही दिले जात नाही. अजूनही काही ठिकाणी त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे लग्न ठरवले जाते. स्वत: काही करायचे असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी सासरी जा, असे सांगून दुर्लक्ष केले जाते. सासरचे लोक चांगले नसतील तर ते ही सुनेला तिच्या मनाप्रमाणे जगू देत नाहीत. त्यामुळेच काही मुलींची स्वप्ने ही कायमची दडपून जातात.

परंतू शीला तशा नव्हत्या. त्यांची विचारसरणी सगळ्यांच्या पलीकडे होती. त्यांना त्यांच्या कारकिर्दीपेक्षा काहीही महत्वाचे वाटत नव्हते. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करायचे होते मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न करायचे ठरवले. त्यामुळे त्या हताश झाल्या.

आपल्या आयुष्यात अशा अनेक मजबुरी असतात, ज्या आपल्याला आपल्या लोकांपासून वेगळे व्हायला भाग पाडतात. शीला यांच्या आयुष्यात सुद्धा अशीच वेळ आली आणि काही वैयक्तिक मजबुरींमुळे त्यांनी आपले घर सोडले.

शीला यांनी वयाच्या 18 व्या वर्षी घर सोडले. घर सोडून पुण्याला जाणे त्यांना योग्य वाटले. पुण्यात पोहचल्यानंतर त्यांच्यासमोर सर्वात मोठी समस्या उभी राहिली ती म्हणजे आपला उदरनिर्वाह कसा करायचा? राहण्याची आणि खायची सोय कशी करायची? कारण त्यांनी जेव्हा घर सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांनी घरातून बाहेर पडताना सोबत काहीही आणले नव्हते.

पुढे काही दिवसांतच शीला यांनी ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह करण्याचा विचार पक्का केला. तेव्हा त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. प्रथम तर त्यांना ऑटोचालक होण्यासाठी रिक्षा भाड्याने घेण्याची गरज होती. शीला ह्या एक स्त्री आहेत म्हणून समाजाने त्यांना तसे करू दिले नाही. सर्वांनी त्यांना ऑटोरिक्षा भाड्याने देण्यास नकार दिला.

परंतु त्यांनी ऑटोचालक होण्याचा दृढ निश्चय केला होता. त्यांनी हार न मानता वेगवेगळ्या नोकऱ्या करून नवीन ऑटो रिक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि आज त्या भारतातील पहिल्या महिला ऑटो चालक बनल्या आहेत. यापुढचा प्रवासही त्यांच्यासाठी सोपा नव्हता. कारण एका महिलेला ऑटो चालवताना पाहून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.

ऑटो चालवत असतानाच त्यांना शिरीष भेटले. अनेकवेळा भेट झाल्यामुळे दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले. त्यामुळे दोघांनीही लग्न करायचे ठरवले. लग्नानंतर काही काळ दोघेही ऑटो चालवून कष्ट करू लागले. मेहनत आणि कठोर परिश्रम केल्यानंतर दोघांनीही त्यांची स्वतःची ट्रॅव्हल कंपनी सुरू केली.

प्रत्येक मुलीला तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी फक्त हिंमत हवी, असे शिला यांचे ठाम मत आहे. शीला यांनी समाजातील गोष्टीकडे दुर्लक्ष करून ऑटोचालक बनल्या आणि त्या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

अनेक अडचणी आल्यातरही त्यांनी कधीच हार मानली नाही आणि प्रत्येक संकटाला जिद्दीने सामोऱ्या गेल्या. आजच्या काळात शीला सर्व महिलांनासाठी एक प्रेरणा ठरलेल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील “भारताची लक्ष्मी” या मोहमेतही शीला सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page