देशसेवा करण्यासाठी लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली, दुसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करून बनल्या IAS अधिकारी!

यूपीएससी परीक्षा ही देशातील सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक आहे, म्हणून ती उत्तीर्ण होणे ही एक मोठी गोष्ट मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार युपीएससी परीक्षा देतात. मात्र, काही मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असतो.

प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा प्रवास असतो. आज आपण अशाच एका आयएएस अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयएएस अधिकारी होण्‍यासाठी परदेशातील आपली प्रतिष्ठित नोकरी सोडण्‍याचा निर्णय घेतला.

तेलंगणा येथे राहणाऱ्या हरी चंदना यांचे हरी यांचे वडील आयएएस अधिकारी होते, तर आई गृहिणी आहे. हरी चंदना या लहानपणापासून हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण तेलंगणा आणि हैदराबाद येथे पूर्ण केले. यानंतर त्यांनी हैदराबादच्या सेंट एन्स कॉलेजमधून आपले पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हैदराबाद विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

पुढे हरी चंदना यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पर्यावरणीय अर्थशास्त्रात एमएससीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांना जागतिक बँकेत नोकरी ही मिळाली. त्यानंतर लंडनमधील बीपीशेल सारख्या चांगल्या कंपनीतही त्यांनी काम केले.

परंतु त्यांनी आपल्या वडिलांना लहानपणापासूनच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना पाहिले होते. म्हणून त्यांचे आयएएस अधिकारी व्हायचे स्वप्न होते. यामुळे त्यांनी युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अखेर कठोर परिश्रमाने 2010 मध्ये हरी चंदना यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

हरी चंदना यांचे ध्येय फक्त आयएएस बनणे नाही तर देशसेवा करणे हे होते. आयएएस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी देशातील घाण स्वच्छ करण्याचे काम केले. त्यांनी कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचे काय होते? त्यांचा पुनर्वापर कसा केला जातो? या सगळ्या बाबींवर संशोधन केले.

त्यांनतर त्यांनी या बाटल्यांचा कचरा व्यवस्थापनासाठी सुद्धा वापर केला. हरित क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपटे लावले. हैदराबादचे रस्ते आणि 120 उद्याने कचऱ्याच्या बाटल्यांनपासून बनवलेल्या झुंबरांनी सजवली होती. नंतर खराब झालेले ड्रम आणि टायर रंगवून ते उद्यानातील सजावटीसाठी वापरली.

हरी चंदना दासरी ह्या अशा अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्या भारताची एक मोठी समस्या सोडवण्याच्या दिशेने काम करत आहेत. त्यांनी या पदावर पोहोचण्यासाठी परदेशात असलेली चांगली नोकरी सोडून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

काही लोक परदेशात जाण्यासाठी उत्सुक असतात, या उलट हरी चंदना यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी आयएएस अधिकारी बनल्या. त्यांनी सगळ्यांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page