1 कोटी पगाराची नोकरी नाकारून सुरु केला स्वतःचा बिझनेस, आज कंपनी करत आहे हजारो कोटींची उलाढाल..

आपण जेव्हा बिझनेस बद्दल बोलतो तेव्हा साधारणतः यशस्वी बिझनेसमॅन यांची नावे आपल्याला आधी आठवतात. परंतु आपल्या देशात अनेक बिझनेसवूमनस् देखील आहेत ज्यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि मेहनतीने करोडोंची कंपनी उभी केली आहे. आज आपण अशाच एका यशस्वी बिझनेसवूमन बद्दल जाणून घेणार आहोत.

विनिता सिंह यांचा जन्म दिल्ली येथे 1991 मध्ये झाला. विनिता यांचे वडील तेज सिंह एम्समध्ये शास्त्रज्ञ होते. विनिता यांनी आपले शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रासमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पुढे त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीएचे शिक्षण घेतले.

विनिता सिंह या 1993 ते 2001 यादरम्यान शैक्षणिक सुवर्णपदक विजेत्या राहिल्या आहेत. तसेच त्यांना आयआयटी मद्रास बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्णपदके आणि दोन रौप्य पदके मिळाली आहेत. 2007 मध्ये त्यांनी अहमदाबाद येथे सर्वोत्कृष्ट महिला अष्टपैलू खेळाडूचा दुलारी मट्टू पुरस्कार देखील जिंकला आहे.

कॉम्रेड्स मॅरेथॉन असोसिएशनने 2012 आणि 2013 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च अल्ट्रा-मॅरेथॉन अप आणि डाऊन आणि कॉम्रेड्स बॅक-टू-बॅक असे दोन्ही पूर्ण केल्याबद्दल त्यांना बॅक-टू- बॅक पदक बहाल केले आहे.

आयआयटी मद्रासमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर विनिता यांना ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकेतून वर्षाला 1 कोटी पगाराची प्लेसमेंट मिळाली. पण त्यांना उद्योजक व्हायचे होते. यासाठी त्यांनी ही नोकरी नाकारली आणि वयाच्या 23 व्या वर्षी स्वतःची एचआर सेवा कंपनी सुरू केली.

विनिता ह्या चपला बनवणाऱ्यांकडून शूज विकत घ्यायच्या आणि ते दुकानदारांना पुरवायच्या. मात्र, त्या एवढ्यात खूश नव्हत्या. त्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे स्वप्न होते. जर तुम्हाला काही मोठे करायचे असेल तर ते फक्त भारता पुरतेच मर्यादित न ठेवता ते संपूर्ण जगात प्रसिध्द करा, असे त्यांचे वडील म्हणायचे.

हा विचार करत त्यांनी सर्व प्रकारच्या व्यवसायात काम करण्याचा निर्णय घेतला. असे करत करत त्यांनी अखेर 2012 मध्ये स्वतःचा शुगर ब्रँड सुरू केला. या कंपनीने 10 वर्षांमध्ये जवळपास 80,000 कोटींची उलाढाल केली आहे. हे काही एका दिवसाचे काम नव्हते. यासाठी तब्बल 15 वर्षे वेळ द्यावा लागला आणि मेहनत घ्यावी लागली आहे, असे विनिता म्हणतात.

सध्या विनिता ह्या 300 कोटींची मालकिन बनल्या आहेत. त्यांचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. काम करून त्या एका महिन्यात फक्त 10,000 हजार रुपये स्वतःसाठी साठवायच्या. मुंबईसारख्या मोठ्या शहरात 1 कोटीची नोकरी नाकारून 10,000 मध्ये काम करणे सोपे नव्हते.

त्यावेळेस त्यांनी तीन कर्मचाऱ्यांसह सुरुवात केली होती. विनिता सिंह आता 2015 पासून शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ म्हणून काम करत आहे. त्या सगळ्यांसाठीच एक उत्तम उदाहरण ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page