गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्माला आली, डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, नंतर मेहनत करून IAS बनून इतिहास घडवला

दरवर्षी युपीएससी परीक्षेला लाखो उमेदवार बसतात परंतु काही मोजकेच उमेदवार या परिक्षेत उत्तीर्ण होतात. आपल्याजवळ जिद्द आणि चिकाटी असेल तर कितीही अडचणींना तोंड देत आपण यशाचे शिखर गाठतो. आज आपण अशाच एका आयएएस अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत.

केरळच्या रहिवासी असलेल्या एनीस कनमनी जॉय ह्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. एनीस या लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होत्या. एनीस यांनी पिरावोम येथील शाळेतून आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी त्रिवेंद्रम वैद्यकीय महाविद्यालयातून बीएससीमधून नर्सिंगचे पदवी शिक्षण पूर्ण केले.

पुढे त्यांनी काही कालावधीसाठी नर्सिंग क्षेत्रात इंटर्नशिप केली. परंतु नेहमी त्यांना आपण समाजासाठी काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान त्यांच्या बहिणीने त्यांना युपीएससी परीक्षेचे महत्व सांगितले. समाजात जर बदल घडवायचा असेल तर युपीएससी परिक्षा हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे त्यांनी युपीएससी परीक्षा देण्याचा निश्चय केला.

परंतु तयारी करण्यासाठी कोचिंगची गरज होती. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना कोचिंग क्लासेस लावणे परवडणारे नव्हते. यामुळे त्यांनी स्वतः च तयारी करायला सुरुवात केली. त्या नियमित वर्तमान पत्र वाचू लागल्या. यामुळे त्यांना भरपूर फायदा झाला असे त्या म्हणतात.

त्यानंतर त्यांनी 2010 मध्ये यूपीएससी परिक्षा दिली. एनीस यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. परंतु त्या त्यांच्या क्रमांकावर खुश नव्हत्या. यामुळे त्यांनी पुन्हा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अखेर 2011 मध्ये त्यांनी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली आणि घवघवीत यश मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page