कोल्हापूरच्या कन्येची गगनभरारी! जगविख्यात कंपनीकडून मिळाले तब्बल 60 लाखांचे वार्षिक पॅकेज..

आपल्यात जर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय आपण सहज साध्य करू शकतो. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील सोनाळी या गावातील रहिवासी असलेली अनामिका डकरे ही पेशाने कॉम्पुटर इंजिनियर आहे.

अनमिकाचे वडील शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला उच्च शिक्षणाबाबत नेहमी प्रोत्साहन दिले. अनामिकाने पॉलिटेक्निकमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेतला.

पुढे अनामिकाने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात 2021 मध्ये तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असताना अनामिकाची Adobe या जगविख्यात कंपनीकडून ‘टेक्निकल ऑफिसर’ या पदासाठी निवड करण्यात आली. पुढे तिने Adobe कंपनीमध्ये इंटर्नशिप केली आणि यानंतर तिला वार्षिक 60 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेजची कायमस्वरूपी नोकरी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण मुलीने मिळवलेली ही सगळ्यात मोठी ऑफर आहे. तिच्या या यशामुळे ती सगळ्यांसाठी एक आदर्श ठरली आहे. तिने मिळवलेल्या या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिच्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील अनामिकचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page