पाच वेळा अपयशी झाल्यानंतर सहाव्या प्रयत्नात बनली IAS अधिकारी, पतीने दिला पाठिंबा..

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे हे काही सोपे काम नाही. लाखो उमेदवार युपीएससी परिक्षा देत असतात. त्यांपैकी काही मोजक्याच उमेदवारांना ही परिक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळते. तर काहींना यात अपयश सहन करावे लागते. परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवार कठीण परिश्रम घेत असतात त्यासाठी ते कोचिंगचा आधार घेत असतात.

परंतु आज आपण ज्या महिला आयएएस अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय तसेच अनेक संकटांना तोंड देत यशाला गवसणी घातली आहे. काजल जावला या हरियाणामधील शमिल येथील रहिवासी आहेत. त्यांचे सुरूवातीचे म्हणजेच शालेय शिक्षण शमिल येथे पूर्ण झाले.

त्यांनतर त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे ठरवले आणि उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून काजल यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी शिक्षण घेतले.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काजल यांना नामांकित कंपनी विप्रोमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळेस त्यांना वर्षाला 23 लाख रुपये मिळत होते. विप्रोमध्ये त्यांनी नऊ वर्षे काम केले. त्यांनतर एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असतानाही त्यांना आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवण्याचे स्वप्न होते.

काजल यांच्या वडिलांची आपल्या मुलीला आयएएस अधिकारी बनवण्याचे स्वप्न होते. त्यामुळे वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा काजल यांनी निर्णय घेतला. यादरम्यान काजल यांनी दिल्लीतील अमेरिकन दूतवासात काम करणाऱ्या आशिष मलिकसोबत लग्न केले. त्यांनतर काजल यांच्या पतीनेही त्यांचा आयएएस अधिकारी होण्याच्या स्वप्नाला पूर्ण पाठिंबा दिला.

2016 मध्ये काजल यांनी युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. त्यादरम्यान कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे काजल यांना नोकरी सोडता आली नाही. त्यामुळे त्या दिवसभर नोकरी करून अभ्यास करायच्या. ऑफिसला जाताना कॅबमध्ये 3 तासांच्या प्रवासात त्या अभ्यास करायच्या. तसेच सुट्टीच्या दिवशी त्या पूर्णवेळ अभ्यास करायच्या.

कठोर परिश्रम करत त्या परीक्षेचा अभ्यास करत असत. दरम्यान काजल यांना पाच वेळा अपयश सहन करावे लागले होते. मात्र, तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी जिद्दीने मेहनत करून अखेर 2018 मध्ये काजल यांनी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये त्यांना त्यांच्या वडिलांची आणि पतीची चांगली साथ लाभली.

काजल यांनी प्रथमच IAS प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनतर मुख्य परीक्षेत त्यांनी 1750 पैकी 850 गुणांसह 28 वा क्रमांक प्राप्त केला. पुढे मुलाखतीमध्ये त्यांनी 201 गुण मिळवले, जे त्या वर्षीच्या IAS टॉपर असलेल्या कनिष्क कटारियापेक्षा जास्त गुण मिळाले होते. अशा प्रकारे नोकरी करत त्यांनी वडील आणि पतीच्या साह्याने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page