भावाने स्वतःचे शिक्षण बाजूला ठेवत बहिणीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला, आज तरुणीने मेहनतीने अधिकारी होण्याचे स्वप्न केले पूर्ण..

सातत्यपूर्ण मेहनत आणि परिश्रम केले तर हमखास यश मिळतेच. ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असते, ते एक दिवस नक्कीच काहीतरी च’म’त्का’र घडवतात. यात त्यांना यशाचीही सोबत नक्कीच लाभते. आज आपण अशाच एका तरुणी बद्दल जाणून घेणार आहोत जिने सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2021 च्या मुख्य परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये हिंगोली मधील साखरा येथील विद्या अंकुश कांदे या तरुणीने परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्या कांदे हिचे सुरुवातीचे शिक्षण साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले.

त्यानंतर पुढील शिक्षण तिने परभणी मधील नवोदय विद्यालयातून पूर्ण केले. पुढे तिने साखरा येथे ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्य केले. यादरम्यान तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि आपला अभ्यास तिने सुरुच ठेवला.

सातत्याने दोन-तीन वर्षाच्या परिश्रमानंतर अखेर तिने यशाला गवसणी घातली आणि महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत तिला घवघवीत यश मिळाले. तिची निवड आता महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक पदासाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण मुलींपैकी विद्याने सहावा क्रमांक पटकावला आहे.

विद्या या यशाचे सर्व श्रेय तिच्या आईला आणि भावाला देते. ती लहान असताना तिचे वडील वा’र’ले. त्यांनतर आईने कष्ट करून मुलांना शिकवले. हळूहळू मुलं मोठी झाल्यानंतर विद्याचा भाऊ विकास याने स्वत:चे शिक्षण बाजूला ठेवत विद्याच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. भावाच्या आणि आईच्या कष्टांची जाणीव ठेवत विद्यानेही मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण केले.

विद्याच्या या यशानंतर तिचा भाऊ आणि आई यांना तिचा खूप अभिमान वाटत आहे. कठीण परस्थितीतून मार्ग काढत सतत मेहनत करून तिने हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेल्या यशानंतर तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वच स्तरातून तिचे भरभरून अभिनंदन केले जात आहे. आज विद्या अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page