पत्नीने आपल्या पतीचे स्वप्न केले साकार, पत्नी बनली बस चालक आणि त्याच बस मध्ये पती आहेत कंडक्टर..

सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक लोक असे आहेत की ते आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना भक्कम साथ देत असतात. आज आपण अशीच एक कहाणी जाणून घेणार आहोत.

गाझियाबादचे रहिवासी असलेले मुकेश कुमार आणि पत्नी वेद कुमारी यांना एक 14 वर्षांचा मुलगा आणि एक 2 वर्षांची मुलगी आहे. मुकेश कुमार हे गाझियाबाद बस डेपोमध्ये कंडक्टर म्हणून काम करतात.

आपल्या पत्नीने बस चालक व्हावी अशी मुकेश यांची इच्छा होती. कानपूर मधील रोडवेजमध्ये महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे असे मुकेश यांना समजताच त्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी आपल्या पत्नीचे नाव नोंदवून घेतले.

या संबंधित त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली. त्यांच्या पत्नीनेही आपल्या पतीचा आदर राखत पत्नी वेद कुमारी यांनी प्रशिक्षण घेण्यास होकार दिला. यासाठी सुरुवातीला त्यांच्या सासरच्यांनी त्यांना नकार दिला. पण हळूहळू त्यांनीही वेदकुमारी यांना साथ दिली आणि त्यांना प्रशिक्षण घेण्याबाबत प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

वेद कुमारी या कानपूर बस डेपोमध्ये बस ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेत होत्या. यादरम्यान त्यांच्या सासरच्यांनी त्यांना खूप साथ दिली. त्या खूप लवकर बस चालवायला शिकल्या यामुळे ट्रेनिंग स्कूलच्या लोकांनीही त्यांचे खूप कौतुक केले.

सध्या वेद कुमारी गाझियाबाद येथे बस चालवतात आणि त्याच बस मध्ये त्यांचे पती मुकेश कुमार हे कंडक्टर म्हणून काम करतात. वेद कुमारी यांचे हे समर्पण पाहून मुकेश कुमार यांना खूप आनंद झाला आहे.

‘वेद कुमारीसारखी जीवनसाथी माझा आयुष्यात आहे हे माझे भाग्य आहे’, असे मुकेश म्हणतात. वेद कुमारी यांचा ड्रायव्हिंगशी काही संबंध नव्हता मात्र, पतीने त्यासाठी दिलेली प्रेरणा आणि साथ यामुळे त्या आज उत्तम ड्राइव्हर बनल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page