नागपूरची लेडी कारपेंटर आहे प्रीती हिंगे, वडिलांकडून घेतली प्रेरणा, आज परिसरात आहे सर्वात मोठे फर्निचरचे दुकान..

आपण आजवर सुतार म्हणून काम करणारा पुरुष वर्ग पहिला असेल. परंतु तुम्ही कधी महिला सुतार पहिली आहे का? नाही.. आज आपण अशाच एका महिले बद्दल पाहणार आहोत. नागपूर मधील वाठोडा भागात राहणाऱ्या 31 वर्षीय प्रिती हिंगे यांचे वडील घरातच फर्निचर बनवण्याचे काम करायचे.

आपल्या वडिलांना सुतार काम कार असताना पाहून प्रिती यांना देखील हे काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे प्रिती यांनी आपल्या वडिलांकडे हे काम शिकण्याबाबत हट्ट धरला. यामुळे त्यांच्या वडिलांनी ही प्रिती यांना सुतार काम शिकवले.

हळुहळू प्रिती या सुतारकाम करण्यात पारंगत होऊ लागल्या. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी कपाट बनवले होते आणि हा बनवलेला वॉर्डरोब काही दिवसांतच विकला गेला. त्यामुळे प्रिती यांचा या कामावरचा विश्वास आणखी वाढला.

त्या वडिलांकडे असताना काही वर्ष सुतार काम करत होत्या. त्यांनतर काही वर्षात त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांना एक मुलगा झाला. यादरम्यान त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. म्हणून त्यांनी सुतार काम करण्याचा निर्णय घेतला.

प्रिती यांनी यासाठी एक दुकान भाड्याने घेतले. या दुकानाचे भाडे प्रती महिना आठ हजार रुपये होते. मात्र, प्रिती यांनी बनवलेले फर्निचरला देखील चांगली मागणी होती. या काळात त्यांच्या कुटुंबाने देखील त्यांना चांगली साथ दिली. त्यांना पुढे अजून दोन मुलं झाली तरीही त्यांनी आपले काम सोडले नाही.

आता मागील 8 वर्षांच्या आत प्रीती यांनी त्यांच्या परिसरात सर्वात मोठे फर्निचरचे दुकान उघडले आहे जे तेथील स्थानिक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या कामात प्रिती यांचे वडील आणि पती हे त्यांना चांगली साथ देतात. प्रीती यांना आता भविष्यात फर्निचरचे मोठे शोरूम उघडायचे आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत. प्रीती हिंगे या अनेक महिलांसाठी एक उत्तम उदाहरण ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page