आठवड्यातील शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अभ्यास करुन UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश..

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. या परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो उमेदवार कठोर परिश्रम घेत असतात. नियमितपणे 10/12 तासांपेक्षा अधिक काळ अभ्यास करत असतात. असे असूनही अनेक उमेदवारांना यश मिळत नाही. परंतु, आज आपण अशी एक यशोगाथा पाहणार आहोत ज्यात या मुलीने केवळ आठवड्यातून दोन दिवस अभ्यास करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

देवयानी सिंह ह्या मूळच्या हरियाणातील महेंद्रगड येथील रहिवासी आहेत. त्यांनी एस एच वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, चंदीगड येथून दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी 2014 मध्ये गोवा कॅम्पसमधून बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी पुढे युपीएससी परीक्षा देण्याचा निश्चय केला. आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरूवात केली. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

देवयानी यांना 2015 आणि 2016 या दोन्ही वर्षी परिक्षेत अपयश मिळाले होते. 2017 मध्ये त्यांनी पुन्हा परिक्षा दिली यात त्या मुलाखती पर्यंत पोचल्या मात्र, त्यात त्यांना अपयश आले. लागोपाठ तीन वेळा अपयश आल्यानंतर देखील त्यांनी हार मानली नाही. आपली जिद्द त्यांनी कायम ठेवली आणि अजून जोमाने तयारीला सुरूवात केली.

अखेर जिद्दीने आणि कठोर परिश्रम करून त्यांनी 2018 मध्ये युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी 222 वा क्रमांक मिळवला. यानंतर देवयानी यांची केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड करण्यात आली. यानंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. यादरम्यान त्यांनी पुन्हा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

देवयानी यांची केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यामुळे त्यांना अभ्यासाला अधिक वेळ देता येत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये ही त्या शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पूर्ण वेळ फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायच्या.

अखेर त्यांनी केवळ आठवड्यातून दोन दिवस अभ्यास करूनही परिक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांचा 2019 च्या युपीएससी परीक्षेत संपुर्ण भारतातून 11 वा क्रमांक पटकावला. देवयानी यांची जिद्द खरोखरच अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page