UPSC परीक्षेत मुलीला मदत करण्यासाठी ऑटो ड्रायव्हर असलेले वडील घेत आहेत ऑनलाइन धडे..

आपल्या मुलांनी उच्चशिक्षीत होऊन मोठे यश मिळवावे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. यासाठी ते आपल्या मुलांसाठी दिवसरात्र कष्ट करत असतात. मुलांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी ते आपल्या आवडीनिवडी तसेच स्वप्न बाजूला ठेवतात आणि मुलांच्या स्वप्नासाठी झटत असतात.

ते आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या या उपकारांची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. याचा प्रत्यय देणारी एक गोष्ट नुकतीच समोर आली आहे.

सध्या या पोस्टची सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान चर्चा सुरू आहे. अभिजित मुथा या सो’श’ल मी’डि’या युजरने ही पोस्ट केली आहे. एका रिक्षाचालकाचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे की हा जरी फक्त एक फोटो असला तरी त्या मागचे खरे वास्तव समोर आल्यानंतर तुम्हाला ही त्या परिस्थितीची जाणीव होईल.

अभिजित यांनी ऑटो बुक केली तेव्हा राकेश नाव असलेले चालक त्यांना घेण्यासाठी आले. अभिजित बसले तेव्हा ते युट्युब व्हिडिओ पाहात होते. अभिजित बसल्यानंतर त्यांनी ते बंद करून त्यांना पोहचवण्यासाठी नॅव्हिगेशन सुरु केले.

त्यांनतर काही वेळानंतर चालक राकेश यांनी पुन्हा तो व्हिडिओ चालू केला. ते सतत कोणता व्हिडिओ बघत आहेत हा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा त्यांनी राकेश यांना विचारले असता रोजच्या ताज्या बातम्या तसेच अर्थव्यवस्थेविषयी बातम्या ऐकत असल्याचे चालकाने सांगितले.

यावर, तुम्ही कोणती स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करत आहात का असा प्रश्न विचारला. त्यावर चालक राकेश यांनी जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हाला ही त्यांचे कौतुक वाटेल. ते म्हणाले माझी मुलगी UPSC परीक्षेची तयारी करत आहे. ती जेव्हा ग्रंथालयामधून अभ्यास करून संध्याकाळी घरी येते तेव्हा मी तिच्यासोबत आजच्या घडामोडींवर चर्चा करतो. यामुळे तिला तिच्या अभ्यासात थोडी मदत होते असे त्यांनी सांगितले.

आपल्या मुलीच्या अभ्यासात मदत करणारे हे वडील अद्वितीय आहेत. त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच मुलीच्या भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page