वयाच्या 16 व्या वर्षी श्रवणशक्ती झाली कमी, 4 महिन्यांच्या तयारीत उत्तीर्ण केली UPSC परिक्षा..

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देत असतात. या परीक्षेचा प्रवास खूप खडतर आहे. खूप कमी लोक ही परीक्षा एका प्रयत्नात उत्तीर्ण करू शकतात. आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली.

सौम्या शर्मा या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण दिल्ली येथे पूर्ण केले. सौम्या शालेय दिवसांपासून अभ्यासात हुशार होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांची श्रवणशक्ती गेली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ स्कूलमधून लॉ चे शिक्षण घेतले.

सौम्या यांनी लॉ च्या शेवटच्या वर्षात असताना युपीएससी परीक्षेत बसण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांनी 2017 मध्ये युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यामध्ये त्यांनी 9वा क्रमांक मिळवला. त्यादरम्यान त्यांची मार्कशीट सो’श’ल मी’डि’या’व’र देखील चांगलीच व्हायरल झाली होती. त्यांना सर्व पेपर्समध्ये उत्तम गुण मिळाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी केवळ 4 महिन्यांच्या तयारीत पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

वयाच्या 16 व्या वर्षी अचानक श्रवणशक्ती कमी झाली तरीही सौम्या यांनी कधीही हार मानली नाही आणि नेहमीच मेहनत करत राहिल्या. त्यांची मेहनत आणि समर्पण या गोष्टींमुळेच त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्या आपल्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page